मध्यवर्ती कारागृहात न्यायाधिशांची भेट

By Admin | Updated: September 23, 2016 00:19 IST2016-09-23T00:19:14+5:302016-09-23T00:19:14+5:30

येथील मध्यवर्ती कारागृह बुधवारी जिल्हा न्यायाधीश विमलनाथ तिवारी त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे न्यायालयीन कामकाजासंदर्भात भेट दिली.

The visit of the judges to the Central Jail | मध्यवर्ती कारागृहात न्यायाधिशांची भेट

मध्यवर्ती कारागृहात न्यायाधिशांची भेट

सूचना : तक्रारींचा निपटारा करण्यात येणार
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह बुधवारी जिल्हा न्यायाधीश विमलनाथ तिवारी त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे न्यायालयीन कामकाजासंदर्भात भेट दिली. त्यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी त्यांचे स्वागत केले.
न्यायाधिशांनी कारागृहाच्या वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्यात. बंद्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी कारागृह प्रशासनास विविध सूचना केल्यात. कारागृहातील बंद्यांनी अधीक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाद्वारे तुळसी व इतर झाडांची रोपे तयार केल्याने न्यायाधिशांनी बंद्यांचे विशेष कौतुक केले. तसेच यापैकी काही रोपे न्यायाधीश व त्यांच्या सहकार्यांना सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली.
प्रस्तुत भेटीच्यावेळी जिल्हा न्या. क्र. ५ येथील जिल्हा न्यायाधीश विमलनाथ एस. तिवारी यांच्या समवेत न्यायाधीश शरदप्रसाद ओझा, पी. पी. काळे, एस. पी. गलाले, एम. डी. बिरहारी, वरिष्ठ न्यायालय व्यवस्थापक अनिरुद्ध पतकी व इतर न्यायालयीन कर्मचारी तसेच कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ऐ. आर. जाधव, पी. भुसारे, तुरुंगाधिकारी श्रेणी २ चे अधिकारी एस. यु. माळशिकारे, पी. आर. मोडकर, बि. स. सदांशिव, जे. आर. आठवले, एम. एम. धुतुरे, एम. एम. चव्हाण, सी. एम. कदम, एम. एम. जोशी, आर. जी. वडते व इतर कारागृह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The visit of the judges to the Central Jail