अत्याचारातून अल्पवयीन मुलगी बनली कुमारी माता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST2021-08-14T04:17:27+5:302021-08-14T04:17:27+5:30
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती होऊन तिने अर्भकाला जन्म दिला. त्यानंतर बलात्काराची घटना उघड ...

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी बनली कुमारी माता
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती होऊन तिने अर्भकाला जन्म दिला. त्यानंतर बलात्काराची घटना उघड झाली. मावसभावाने तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्या १७ वर्षीय मुलीच्या गर्भारपणाच्या आठव्या महिन्यात प्रसूती झाली. आरोपी हा दर्यापूर तालुक्यातील रहिवासी आहे.
लग्नाचे आमिष दाखवून ती घरी एकटी असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अमरावतीच्या पीडीएमसी रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. पीडिताचे बयाण व रुग्ण चिकित्सापत्रावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, ठाणेदार सचिन जाधव यांनी भेट दिली.