अतिवृष्टीच्या नुकसानाची वीरेंद्र जगतापांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST2021-09-10T04:18:01+5:302021-09-10T04:18:01+5:30
वेणी गणेशपूर, आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला फटका तातडीने पंचनामे, त्वरित भरपाई मिळण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वेणी गणेशपूर ...

अतिवृष्टीच्या नुकसानाची वीरेंद्र जगतापांनी केली पाहणी
वेणी गणेशपूर, आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला फटका तातडीने पंचनामे, त्वरित भरपाई मिळण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील आदितापूर तलावाच्या भिंतीला अतिवृष्टीमुळे भगदाड पडल्याने पाणी वाहून मार्गातील जमीन खरडून गेली आहे. आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला पावसाचा फटका बसला आहे. शेती, घरे व पिकांच्या या नुकसानाची पाहणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. ज्यांच्या घरात व शेतात पाणी शिरले, त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.
आजनी, फुलआमला, टाकळी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जगताप यांनी केली व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन रिठे, मंगेश जोगे, पोलीस पाटील प्रदीप इतपुरे, गजानन बोकडे, डॉ. प्रमोद कठाळे, सरफराज पठाण, गजानन भस्मे, रमेश चवरे, शिवाजी चव्हाण, दीपक सवाई, प्रवीण सवाई, श्याम मंत्री, सुनील राऊत, प्रवीण कांडलकर, बाळासाहेब कांडलकर, विजय मंत्री, बबलू आडे, संजय घोंगडे, विश्वास राऊत, गजानन खंडारे, सुभाष पांडे, रामेश्वर राऊत, प्रभुदास इंगोले, संतोष चौधरी, अमोल आमले, प्रफुल ठाकरे व शेतकरी मंडळी उपस्थित होती.
090921\img-20210908-wa0009.jpg
वीरेंद्र जगताप यांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी