व्हायरल सर्दी-तापाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:07+5:302021-09-09T04:17:07+5:30
बॉक्स पीडीएमसी, इर्विनच्या बालरोग विभागातील वॉर्ड फुल्ल डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णांची ...

व्हायरल सर्दी-तापाचे संकट
बॉक्स
पीडीएमसी, इर्विनच्या बालरोग विभागातील वॉर्ड फुल्ल
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. पूर्वी पीडीएमसीच्या बालरोग विभागाच्या ओपीडीत रुग्णांची संख्या ३० होती. आता दोन्ही रुग्णालयातील विभागाचे वॉर्ड फुल्ल असल्याची स्थिती आहे. यात व्हायरलचे रुग्ण कमी असले तरी डेंग्यू सदृश आजार व अस्थमाचे रुग्ण अधिक आहेत. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ---, तर पीडीएमसीत ९० बालरुग्ण उपचार घेत आहेत.
--
आता कोरोना नाही, डेंग्यूचे संकट
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सर्दी-ताप, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काहींचे प्लेटलेट्स कमी दिसत असून, डेंग्यू चाचणी अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे ३० टक्के डेंग्यूचे रुग्ण निष्पन्न होत आहे. या तिन्ही आजारात ताप येतो. परंतु ताप आला म्हणजे कोरोना आहेच असे नाही. पण योग्य आजाराचे निदान झाल्यास शंका कुशंकांना वाव राहत नाही, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल वानखडे यानी लोकमतला दिली.
--
ही घ्या काळजी
सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी मुलांना पावसात भिजू देऊ नका. हाताच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. बाहेरचे खाणे टाळा, आहारात भाज्या, फळे, मोड आलेल्या धान्याचा समावेश करा. सध्या डेंग्यूचा प्रकोप असल्याने अंग झाकेल असे कपडे घाला. दिवसा व रात्री मच्छरदानीचा वापर करा. पाणी साचून राहू नये, याची काळजी घ्या.
--
बालरोग विभागाची ओपीडी वाढली
कोरोनाकाळात पीडीएमसीत फार कमी बालरुग्ण आलेत. मात्र, सद्यस्थितीत हा आकडा १४०-१५० वर गेला आहे. सध्या ९० मुलांवर उपचार सुरू असून, बालरुग्णांचे सर्व वॉर्ड हाउसफुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्णांचाही समावेश आहे. मात्र, सर्व धोक्याबाहेर आहेत.
- डॉ. अनिल देशमुख,
अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति मेडिकल कॉलेज