नियमांचे उल्लघंन, १२ मेडिकलचा परवाना तात्पुर्ता निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:13+5:302021-08-28T04:17:13+5:30

वर्षभरात एकूण १५९ घाऊक व किरकोळ मेडिकल स्टोअर्सची औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये प्राथमिक दोष आढळून ...

Violation of rules, temporary suspension of 12 medical licenses | नियमांचे उल्लघंन, १२ मेडिकलचा परवाना तात्पुर्ता निलंबन

नियमांचे उल्लघंन, १२ मेडिकलचा परवाना तात्पुर्ता निलंबन

वर्षभरात एकूण १५९ घाऊक व किरकोळ मेडिकल स्टोअर्सची औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये प्राथमिक दोष आढळून आलेल्या ६७ जणांना सुधारणा नोटीस बजावून कारवाया करण्यात आल्या. तसेच गंभीर स्वरूपाचा दोष आढळून आलेल्या १५ मेडिकल व्यवसायिकांचा तात्पुर्ता परवाना निलंबन करण्यात आला. तसेच फारच गंभीर प्रकार आढळून आल्याने २ जणांचा मेडिकलचा व्यावसायिक परवाना एफडीएने कायमस्वरूपी निलंबन केले असल्याची माहिती औषधी प्रशासन निरीक्षक मनीष गोतमारे यांनी दिली. ही कारवाई औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त उमेश घराटे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक मनीष गोतमारे व त्यांच्या पथकाने केली.

बॉक्स:

७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात २२४२ घाऊक व किरकोळ परवानाधारक मेडिकल व्यावसायिक आहेत. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या व्यवसायिकांवर औषधी प्रशासन विभागाचा वॉच असतो. वर्षभरात चार ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या तर सहा ठिकाणी कारवाई करून अवैधरित्या औषधीसाठा आढळून आल्याने ६ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बॉक्स:

नियमभंग काय?

विना प्रस्क्रीप्शनशिवाय झोपेच्या गोळ्यांची विक्री करणे, ज्यांच्या नावावर परवाना आहे तोे फार्मासिस्ट उपस्थित नसणे, अधिकृत बिलींग नसणे, किंवा मेडिकलमध्ये स्वच्छता नसणे आदी बाबा औषधी निरीक्षक तपासतात. दोषी आढळल्यास आधी कारणेदाखवा किंवा सुधारणा नोटीस बजाविण्यात येते. गंभीर स्वरुपाचा दोष असल्यास परवाना निलंबन करण्यात येते.

कोट

वर्षभरात ६७ जणांना नोटीस बजाविली आहे. दोष आढळून आल्यास १२ मेडिकल व्यवसायिकांचा परवाना तात्पुर्ता निलंबन केला. वर्षभरात ६ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

मनीष गोतमारे, औषधी निरीक्षक अमरावती

Web Title: Violation of rules, temporary suspension of 12 medical licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.