वाठोडा शुक्लेश्वर येथे बँकेसमोर संचारबंदीचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:56+5:302021-04-27T04:13:56+5:30
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथे संचारबंदीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नियमाचे पालन ...

वाठोडा शुक्लेश्वर येथे बँकेसमोर संचारबंदीचे उल्लंघन
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथे संचारबंदीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नियमाचे पालन आणि कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत काही मोजकीच व्यवस्था बँकेच्यावतीने करण्यात आली आहे. ज्यामुळे सोशल डिस्टेनसिंगचा फज्जा उडताना दिसून येत आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत लोकांना जीवनावश्यक वस्तू किराणा, फळ, पालेभाज्या घेण्याकरिता प्रशासनाने संचारबंदीचे नियम पाळून सूट दिलेली आहे. परंतु येथील जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील नागरिक पैसे काढण्याकरिता येत असेून मोठ्या प्रमाणात बँकेसमोर गर्दी होत आहे. भर उन्हात नागरिकांना पैसे काढण्याकरिता बँकेसमोर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. बँकेकडून नागरिकांना कमी प्रमाणात सुविधा मिळत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.