विनोद शिवकुमारच्या गुन्ह्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:46+5:302021-04-06T04:12:46+5:30

परतवाडा : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत लिहिलेल्या काही बाबींचा तपास पोलिसांनी केला. ...

Vinod Shivkumar's rise in crime | विनोद शिवकुमारच्या गुन्ह्यांत वाढ

विनोद शिवकुमारच्या गुन्ह्यांत वाढ

परतवाडा : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत लिहिलेल्या काही बाबींचा तपास पोलिसांनी केला. यानंतर निलंबित उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध तीन कलमांन्वये गुन्ह्यांची वाढ करण्यात आली.

धारणी पोलीस ठाण्यात दीपाली चव्हाण यांचे आत्महत्येप्रकरणी २५ मार्चला गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील या करत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, आरोपी विनोद शिवकुमार याने त्रास दिल्याने गर्भपात झाल्याचे नमूद आहे.

तपासादरम्यान मृतकाच्या औषधोपचाराचे कागदपत्रे प्राप्त करण्यात आले तसेच साक्षीदारांचे बयाण नोंदविण्यात आले. तपासादरम्यान नोंदविण्यात आलेले साक्षीदारांचे जाब-जबाब, वैद्यकीय कागदपत्रे या अनुषंगाने आरोपी विनोद शिवकुमार याने दिलेल्या त्रासामुळे गर्भपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते तसेच आरोपी विनोद शिवकुमार याने मृतक हिस शिवीगाळ करून निलंबित करण्याची धमकी देऊन भयभीत करून अपमानित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. करीता सदर गुन्ह्यांत कलम ३१२,५०४,५०६ भादंविच्या कलम ४ एप्रिलला वाढविण्यात आल्या. त्याबाबत न्यायालयास माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Vinod Shivkumar's rise in crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.