जनावरे चोरुन नेणारा ट्रक गावकऱ्यांनी पेटविला
By Admin | Updated: January 23, 2015 23:59 IST2015-01-23T23:59:01+5:302015-01-23T23:59:01+5:30
गोठ्यातून जनावरे चोरुन नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. चोरलेली जनावरे वाहून नेणारा ट्रकही संतप्त गावकऱ्यांनी पेटवून दिला.

जनावरे चोरुन नेणारा ट्रक गावकऱ्यांनी पेटविला
चांदूररेल्वे : गोठ्यातून जनावरे चोरुन नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. चोरलेली जनावरे वाहून नेणारा ट्रकही संतप्त गावकऱ्यांनी पेटवून दिला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास जळका जगताप गावा नजकीच्या अमरपूर येथे घडली.
उमरपूर येथील शेतकरी राजू हरिभाऊ गवई यांच्या गोठ्यातील ४ बैल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. बैल चोरुन नेताना एका बैलाची वेसून तुटल्यामुले तो चोरट्यांच्या हातून निसटून सैरावैरा पळू लागल्यामुळे बैलावर कुत्रे भुंकू लागले. त्यामुळे बैल मालक राजू गवई यांना जाग आली. त्यांना गोठ्याची पाहणी केली असता ४ बैल गोठ्यात दिसले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना जागे केले. दरम्यान उमरपूर ते जळका जगताप रस्त्यावर मिनी ट्रक एमएच ३०-एबी१८७२ एकता ट्रान्सपोर्ट जनता भाजी बाजार अमरावती असे लिहिलेला आढळून आला. मिनीट्रक खड्ड्यात फसल्यामुळे तो काढण्याचा प्रयत्न करीत असताना गावकऱ्यांचा आवाज ऐकून बैलचोर पसार झाले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात दिली. (प्रतिनिधी)