खराळा येथील ग्रामसेवकाला मारहाण

By Admin | Updated: June 17, 2017 00:12 IST2017-06-17T00:12:53+5:302017-06-17T00:12:53+5:30

ग्रामस्थाने नियमांचे उल्लंघन करून सातबारा व आठ अ देण्यास नकार देणाऱ्या खराळा येथील ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

The villager in Khalalas beat up | खराळा येथील ग्रामसेवकाला मारहाण

खराळा येथील ग्रामसेवकाला मारहाण

आरोपीला अटक : सातबारा देण्यास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : ग्रामस्थाने नियमांचे उल्लंघन करून सातबारा व आठ अ देण्यास नकार देणाऱ्या खराळा येथील ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना मंगळवारी घडली.
संदीप गोहत्रे असे खराळा येथे नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात काम करीत असताना स्थानिक रहिवासी भय्या कडू याने कार्यालयात येऊन सातबारा व ८ अ ची मागणी केली. यावर ग्रामसेकाने थकीत घर कराचा भरणा करण्यास सांगितले. त्यानंतरच कागदपत्रे देता येतील, असे ग्रामसेवकाने त्याला सांगितले. मात्र, यावरून संताप अनावर होऊन भय्या कडू याने ग्रामसेवक गोहत्रे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. कागदपत्रांची फेकफाक केली. घटनेची माहिती गोहत्रे यांनी चांदूर ठाण्यात दिली. पीआय सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस चमुने आरोपी भय्या कडूला अटक केली व आरोपी विरूद्ध भादंविच्या कलम ३३२, ३५३, १८६. ५०४, ५०६, ३२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: The villager in Khalalas beat up