भातकुली पंचायत समितीकडून विजय राऊत यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:48+5:302021-09-19T04:13:48+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली पंचायत समितीकडून सभापती, उपसभापती यांचे स्वीय सहायक विजय राऊत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ...

भातकुली पंचायत समितीकडून विजय राऊत यांचा सत्कार
टाकरखेडा संभू : भातकुली पंचायत समितीकडून सभापती, उपसभापती यांचे स्वीय सहायक विजय राऊत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विजय राऊत यांनी सन १९९२ ते ११९३ दरम्यान विविध विभागांमधील स्थानिक लेखा निधीचे प्रलंबित ४५० परिच्छेद निकाली काढले. याशिवाय संबंधित विभागांच्या आक्षेपाचे अनुपालन तयार करणे, परिच्छेदाचे अनुपालन, सीईओ ते आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी घेऊन परिच्छेदाचे अनुपालन मंजूर करून आणणे, शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ, याशिवाय अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून विविध कामे मार्गी लावणे व सद्यस्थितीत सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांचे स्वीय सहायक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. यावेळी सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, गटविकास अधिकारी संजय काळे, पंचायत समिती सदस्य उषा बोंडे व पदाधिकारी उपस्थित होते.