ढाकुलगावच्या सरपंचपदी विजय कांडलकर

By Admin | Updated: May 8, 2015 00:29 IST2015-05-08T00:29:21+5:302015-05-08T00:29:21+5:30

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ढाकुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ..

Vijay Kandalkar as the Sarpanch of Dhakulgaon | ढाकुलगावच्या सरपंचपदी विजय कांडलकर

ढाकुलगावच्या सरपंचपदी विजय कांडलकर

धामणगांव रेल्वे : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ढाकुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे विजय कांडलकर यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी सुनीता पोहेकर यांची वर्णी लागली आहे.
सरपंचपदासाठी विजय कांडलकर व रसिका म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले होते़ यात भाजपचे विजय कांडलकर यांना ७ मते मिळालीत. रसिका म्हात्रे यांचा दारूण पराभव झाला़ या निवडणुकीत म्हात्रे यांच्या नावापुढे कुणीही हात उंच न केल्यामुळे यांना शून्य मते मिळाली आहेत. उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनीता राजेंद्र पोहेकर व अर्चना कंगाले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले़
निवडणुकीत पोहेकर यांना पाच मते मिळालीत, तर कंगाले यांना दोन मते मिळाली. या निवडणुकीत ग्रा़प़ंसदस्य ज्ञानेश्वर वाळके, रामेश्वर ठाकरे, सुनीता बाभुळकर यांनी सहभाग घेतला होता़ पुन्हा पाच वर्षांनंतर भाजपने या ग्रामपंचायतीवर विजय कांडलकर यांच्या माध्यमातून झेंडा फडकविला आहे़ यासाठी मनीष बाभुळकर, अमित पोहेकर, सचिन बुटले, विलास मोखळकर, उमेश तितरे, ओमकर बाभुळकर, राजेंद्र पोहेकर, सतीश इंगळकर, अशोक सारवे, प्रदीप माकोडे, मोरेश्वर वऱ्हाडे, अनिल राजुरकर, इरफान शहा, दादा शहा यांनी प्रयत्न केले.
ढाकुलगाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा सरपंच निवडून आल्यानंतर येथील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीला प्रचंड रंगत आली होती. ही निवडणूक बहुचर्चित ठरली. उपसरपंचपदी सुनीता पोहोकार यांची निवड झाली आहे.

Web Title: Vijay Kandalkar as the Sarpanch of Dhakulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.