वाहनांच्या नूतनीकरणाचे होणार व्हिडिओ चित्रिकरण
By Admin | Updated: March 17, 2017 00:06 IST2017-03-17T00:06:25+5:302017-03-17T00:06:25+5:30
न्यायालयाच्या निर्देशानंतर नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनांची नोंद आता व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे केली जाणार आहे.

वाहनांच्या नूतनीकरणाचे होणार व्हिडिओ चित्रिकरण
अमरावती : न्यायालयाच्या निर्देशानंतर नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनांची नोंद आता व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे केली जाणार आहे. येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रादेशिक परिवहन विभागामार्फत चित्रिकरणाद्वारे वाहनांची नोंदणी केली जात आहे.
जुनी वाहने नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात आल्यानंतर आता अधिकाऱ्यांद्वारे त्या वाहनांची तपासणी करतानाचे चित्रिकरण केले जाणार आहे. यातून त्यावाहनांची तपासणी कितपत योग्य पद्धतीने करण्यात आली, याचे निरीक्षण केले जात आहे. यादृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने जय्यत तयारी केली असून यायंत्रणेद्वारे उपक्रमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. यापुढे कोणत्याही वाहनाचे नूतनीकरण चित्रिकरणाशिवाय होणार नाही. याबाबतच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. एकीकडे याउपक्रमाची अंमलबजावणी प्रशासनाद्वारे काटेकोरपद्धतीने केली जात आहे तर दुसरीकडे आरटीओ विभागाने चित्रिकरण केलेला डाटा किती दिवस ठेवायचा, याबाबतचे अद्याप स्पष्ट आदेश नसले तरी नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे चित्रिकरण मात्र निर्देशांनुसार काटेकोर पद्धतीने केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ कार्यालयात नवीन ४० सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले आहे. यात सर्व आॅनलाईन प्रक्रिया समाविष्ट आहे. अर्जदारांनी चुकीची माहिती भरू नये, याची दक्षता घेतली जात आहे. वाहन नूतनीकरणाचे चित्रिकरण करून यापुढे नोंदणी केली जाईल. याउपक्रमाची तयारी सुरू आहे. याची अंमलबजावणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जात असल्याचे आरटीओ श्रीपाद वाडेकर यांनी सांगितले.