VIDEO- चिखलदरामध्ये पर्यटकांची जीवघेणी कसरत

By Admin | Updated: August 16, 2016 18:30 IST2016-08-16T17:49:48+5:302016-08-16T18:30:07+5:30

चिखलदरा येथे सलग तीन दिवस सुट्या असल्याने रविवार, १५ आॅगस्ट रोजी येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली

VIDEO - The pilot exercise of pilgrims in Chikhaldara | VIDEO- चिखलदरामध्ये पर्यटकांची जीवघेणी कसरत

VIDEO- चिखलदरामध्ये पर्यटकांची जीवघेणी कसरत

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 16 - जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे सलग तीन दिवस सुट्या असल्याने रविवार, १५ आॅगस्ट रोजी येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेक पर्यटकांनी जीवघेणी कसरत करून आपला जीव धोक्यात टाकल्याचे दिसून आले. पण यांना अटकाव करण्यासाठी कोणीही दिसून आले नाही.
चिखलदरा येथे विविध पर्यटन स्थळे आहेत. प्रसिद्ध असे पाइंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पाइंटच्या ठिकाणी लवकर पोहोचावे म्हणून चक्क डोंगर उतरताना दिसून आले. आधीच डोंगरावर पाणी असल्यानं त्यात पाय घसरल्यास मोठी हानी होण्याची शक्यता होती. याचाही कोणी विचार करताना दिसून आले नाही. विशेष म्हणजे यामध्ये लहान बालकांना घेऊन जाणा-याही काही पर्यटकांचा समावेश होता.

Web Title: VIDEO - The pilot exercise of pilgrims in Chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.