शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

Video : वर्धा नदीतील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला, धबधब्याखाली घेतला होता आडोसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 08:33 IST

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत नदीपात्रात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह दिसत असून धबधब्यातूनही मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या धबधब्याच्या पायध्याला एक आडोसा घेऊन नाव थांबविण्यात आल्याची दिसून येत.

अमरावती - जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. नावाड्यासह तिघांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले. त्यात दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. इतरांचा शोध सुरु आहे. या घटनेपूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये, पाण्याच्या प्रवाहात नाव एका जागी थांबल्याचे दिसून येत आहे. 

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. त्यामुळे मटरे कुटुंबातील १२ जणांना नौकानयनाचा मोह झाला. सकाळी दहाच्या सुमारास नाव महादेव मंदिराकडे जात असताना उलटली. नावेत १३ जण होते. त्यात अतुल वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (२०), अदिती खंडाते (१०), मोना खंडाते (१२), आशु खंडाते (२१, सर्व रा. वर्धा), निशा मटरे (२२), पियुष मटरे (८, दोघे रा. गाडेगाव), पुनम शिवणकर (२६) यांचा समावेश आहे. नाविक नारायण मटरे (४५), किरण खंडारे (२८), वंशिका शिवणकर (२) यांचे मृतदेह सापडले. अद्यापही इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नदीपात्रात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह दिसत असून धबधब्यातूनही मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या धबधब्याच्या पायध्याला एक आडोसा घेऊन नाव थांबविण्यात आल्याची दिसून येत. याच प्रवाहात नावेतील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने व पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने नावेचे संतुलन राखणे शक्य झाले नसल्याचे दिसून येते. 

बेकायदेशीर जलपर्यटनाचे बळी

नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथे मच्छीमारांच्या होड्यांमध्ये नदीत फेरफटका मारणे याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनेकदा नाविक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवतात. जलसफारी करताना जीवरक्षक साधनांचा वापर होत नाही. जल सफारी घडवणाऱ्या या होड्या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांना मच्छीमारी किंवा पर्यटन असा कोणताही परवाना नाही. हे ११ जण याच बेकायदेशीर जलपर्यटनाला बळी पडले.

अडथळ्यांतही बचावकार्य सुरू

मुसळधार पावसातही प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरू असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता आहे. अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या २० जणांची चमू दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची चमूही दाखल झाली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीDeathमृत्यूwardha-acवर्धाWardha Riverवर्धा नदी