विदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:36 AM2019-07-21T01:36:21+5:302019-07-21T01:37:51+5:30

विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Vidarbha's orange process will be beneficial | विदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा

विदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा

googlenewsNext
ठळक मुद्देठाणाठुणीत ज्यूस प्रकल्प। मोर्शी तालुक्यातील संत्रा उन्नती प्रकल्पामुळे उत्पादकांना ‘अच्छे दिन’

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ठाणाठुनी येथे १०० एकरापेक्षा अधिक जमिनीवर जैन इरिगेशन, कोकाकोला व शासन भागीदार असलेला संत्रा उन्नती प्रकल्प नव्याने उदयास येत असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. संत्रा प्रकल्प हा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी उन्नतीची पर्वणीच ठरणार आहे. विदर्भातील संत्र्याला आता प्रक्रियेची साथ लाभणार आहे. तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात आली आहे.
राज्यात दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड होते. त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरूड, मोर्शी परिसरात आहे. त्यामुळेच या भागाला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’देखील म्हटले जाते. याआधी मोर्शी, वरूड तालुक्यात संत्रा ज्यूस प्रकल्पाची उभारणी शक्य झाली नाही. स्थानिकांच्या दबावामुळे कृषी औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून मायवाडी (जि. अमरावती) व काटोल (जि. नागपूर) येथे संत्रा ग्रेडिंग आणि साठवण प्रकल्प उभे झाले. परंतु, त्याचा संत्रा उत्पादकांना काही एक फायदा झाला नाही.
अशी आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांकडून ‘सी’ ग्रेड संत्री व चुरा विकत घेतील. त्याला निश्चित दर मिळेल. लेमन ज्यूस तयार होणार; त्यामुळे प्रकल्प सात महिने चालणार. बेडवरील सघन लागवडीकरिता एकरी ३३३ रोपांची गरज. ठिबक सिंचनाचा खर्च राहील. लागवडीनंतर तीन वर्षांत फळधारणा. या कालावधीत हळद किंवा आल्याचे आंतरपीक घेता येते. २० हजार हेक्टर अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांत लागवडीचे उद्दिष्ट आहे. १०४ एकरांवर साकारणार प्रकल्प. ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प एका वर्षात पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना सुविधा
ब्राझील येथीलच पाच वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाणार आहेत. प्रात्यक्षिक प्लॉट राहतील. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोयदेखील या ठिकाणी आहे. हायटेक आॅडिओ व्हिडीओ बसचा संत्रा उन्नती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी व संत्राबागांना भेटी देण्यासाठी उपयोग होणार असून, त्याद्वारे शेतकºयांना दर्जेदार शेती प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत.

Web Title: Vidarbha's orange process will be beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.