शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा सध्या @ ४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:24 AM

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाल्याने या थंड हवेच्या ठिकाणाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपर्यटकांनी फिरवली पाठ

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाल्याने या थंड हवेच्या ठिकाणाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत येथे ३९ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे झाली. रस्ते सुनसान पडले आहेत. जंगलात सतत आगडोंब उसळत असल्यानेही तापमानात वाढ होत आहेकधीकाळी येथे उन्हाळ्यात हजारो पर्यटकांची गर्दी राहायचीे. विश्रामगृह किंवा हॉटेलचे आरक्षण मिळणेही कठीण जायचे. दोन महिने आधी चौकशी केली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने स्थानिकांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पर्यटकांनाही भीषण पाणीटंचाई व आता प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. चिखलदऱ्याला मागील काही वर्षात अवकळा आल्याने आता नावालाच पर्यटनस्थळ उरले का, असा सवाल पर्यटक निराश मनाने परत जाताना करीत आहेत. येथील नगरपालिकेच्या पर्यटक कर वसुली नाक्यावरसुद्धा अल्प पर्यटकांची नोंद आहे. नागपूर येथील एका कुटुंबाने येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी विवाह समारंभ ठेवला होता. त्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनीसुद्धा चिखलदऱ्याबद्दल ऐकले, त्याच्या विपरित स्थिती असल्याचे मत मांडले.गतवर्षी ४२ अंशाची नोंद, तापमानात सतत महिनाभर वाढसमुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या या पर्यटनस्थळावर दरवर्षी तापमानात वाढ होत असल्याचे वास्तव आहे. येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर पूर्ण मे महिन्यात ३७ ते ३९ अंश सेल्सिअस कमाल तर २४ ते २७ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. गुगलवर ३९ ते ४० अंश तापमानाची नोंद दाखवित आहे. गतवर्षी सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद येथील तापमान केंद्रावर झाली आहे.चिखलदरा येथील तापमान दरवर्षी ३९ ते ४० अंश अंश सेल्सीअसपर्यंत राहते. गतवर्षी ४२ अंश सेल्सीअसची नोंद झाली होती. देशभर हवामानात होत असलेल्या बदलाचा फटका चिखलदरासुद्धा बसला आहे.- प्रा. विजय मंगळे, पर्यावरणशास्त्र विभाग, सिपना महाविद्यालय चिखलदरा

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा