विदर्भ प्रबोधन मंडळाची आठ वर्षांपासून आमसभाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST2021-09-11T04:14:58+5:302021-09-11T04:14:58+5:30

अमरावती : नियमानुसार दरवर्षी आमसभा होणे गरजेचे असताना सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांना तिलांजली देत विदर्भ प्रबोधन मंडळ दर्यापूरची ...

Vidarbha Prabodhan Mandal has not held a public meeting for eight years | विदर्भ प्रबोधन मंडळाची आठ वर्षांपासून आमसभाच नाही

विदर्भ प्रबोधन मंडळाची आठ वर्षांपासून आमसभाच नाही

अमरावती : नियमानुसार दरवर्षी आमसभा होणे गरजेचे असताना सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांना तिलांजली देत विदर्भ प्रबोधन मंडळ दर्यापूरची गेल्या सन २०१४ पासून म्हणजे आठ वर्षांपासून एकदाही आमसभाच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, त्यासंदर्भाची विदर्भ प्रबोेधन मंडळ दर्यापूरचे कार्यकारिणी सदस्य जयसिंग देशमुख यांनी धर्मदाय उपआयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

खुद कार्यकारिणी सदस्य असलेल्या जयसिंग देशमुख यांनीच विदर्भ प्रबोधन मंडळाला घरचा अहेर दिला आहे. आदी जयसिंग देशमुख यांनी विदर्भ प्रबोधन मंडळ दर्यापूरचे सचिव रवींद्र गणोेरकर यांनी पत्र देऊन आठ वर्षांचे संस्थेचे आडिट झालेले अहवाल देण्यात यावे ही १९ सप्टेंबर २०२० ला विनंती केली होती. मात्र त्यांनी या विनंतीला कुठलीही दाद न देता दुर्लक्ष केले. म्हणून त्यांनी २२ ऑक्टोबर २०२० ला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात धाव घेतली. तातडीने आमसभा घेऊन कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात घ्यावे व कार्यकारिणी सदस्यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात, अशी मागणीही जयसिंग देशमुख यांनी केली.

कोट आहे.

Web Title: Vidarbha Prabodhan Mandal has not held a public meeting for eight years