विदर्भ मिल परिसरात वेडसर इसमाने उगारला चाकू, नागरिकांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:06+5:302021-01-08T04:37:06+5:30
परतवाडा : विदर्भ मिल स्टॉपवर वास्तव्यास असलेल्या वेडसर इसमाने चहा दिला नाही म्हणून चाकू उगारून एका जणाचा पाठलाग केला. ...

विदर्भ मिल परिसरात वेडसर इसमाने उगारला चाकू, नागरिकांकडून चोप
परतवाडा : विदर्भ मिल स्टॉपवर वास्तव्यास असलेल्या वेडसर इसमाने चहा दिला नाही म्हणून चाकू उगारून एका जणाचा पाठलाग केला. काही नागरिकांनी सतर्कता बाळगून त्याच्याकडील चाकू हिसकला व चोप देऊन दूर हाकलले. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, विदर्भ मिल परिसरात या वेडसर इसमाचे बरेच दिवसांपासून वास्तव्य आहे. त्याच्याकडे एक छोटा व एक मोठ चाकू आहे. परिसरातच भटकंती करून तो हॉटेल, टपरीवर जाऊन तो नाष्टा चहाची मागणी करतो. मागणीनुसार चहा किंवा नाष्टा दिला नाही, तर तो चाकू काढतो. हा त्याचा नित्यक्रम आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजतादेखील त्याने टपरीवर आलेल्या ग्राहकाला चहा मागितला. नकार मिळताच चाकू घेऊन तो त्याच्यामागे धावला. किराणा, कटलरी दुकानांतही चाकू उगारत त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, काही नागिरकांनी त्याला शिताफीने पकडले आणि चांगला चोप देत काढून दिला. याप्रकरणी तक्रार दाखल झाली नाही. घटनेच्या अनुषंगाने पोलिसांची वाहन पोहोचले. मात्र, ते वाहन कोणत्या पोलीस ठाण्याचे, ही माहिती मिळाली नाही.