शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vidarbha Flood: सहा लाख हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीमुळे पाण्यात; ऑगस्टच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:49 IST

Amravati : ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यातच ४.५८ लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. त्यातच पुढील चार दिवस हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जाहीर केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १,०८,९१३ शेतकऱ्यांच्या ९८,२०९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी एनडीआरएफच्या निकषाने ८८.२३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक ८७,३९० हेक्टरमध्ये नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झालेले आहे. जुलै महिन्यात २०४ शेतकऱ्यांच्या ५२,९२९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३१,५४२ हेक्टरमध्ये नुकसानदेखील बुलढाणा जिल्ह्यातील आहे.

पश्चिम विदर्भात यवतमाळ व वाशिम जिल्हा वगळता अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. तरीही ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी १५ टक्के तूट भरून निघाली. 'महावेध'च्या अहवालानुसार, विभागात आतापर्यंत ५८१.५ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना ५७८.५ मिमी पाऊस झालेला आहे. 

आठ दिवसांत ४.५८ लाख हेक्टर बाधितऑगस्ट महिन्यात १३ ते २० तारखेदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीने विभागात ४४ तालुक्यांतील ३१५२ गावे बाधित झाली. या गावांमध्ये ४,५७,५८८ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १,१८,३५९ हेक्टर, वाशिम ९८,३५३ हेक्टर, अकोला २६,९४१ हेक्टर, बुलढाणा ८९,७२८ हेक्टर व अमरावती जिल्ह्यात ५४,२०६ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. या बाधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती