कोरोना टेस्टिंग कॅम्पला परतवाड्यात अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:59+5:302021-03-01T04:15:59+5:30
फोटो पी २८ परतवाडा कोरोना परतवाडा : अचलपूर नगर परिषद व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना ...

कोरोना टेस्टिंग कॅम्पला परतवाड्यात अत्यल्प प्रतिसाद
फोटो पी २८ परतवाडा कोरोना
परतवाडा : अचलपूर नगर परिषद व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना टेस्टिंग कॅम्पला परतवाड्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी या कॅम्पकडे पाठ फिरविल्यागत परिस्थिती बघायला मिळाली.
परतवाडा येथील कल्याण मंडपम् येथे २६ फेब्रुवारीला हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जवळपास २५० अपेक्षित लोकांची यादीही त्याकरिता निश्चित केली गेली. आरटी-पीसीआर टेस्टकरिता आवश्यक स्वॅब घेण्याकरिता आरोग्य विभागाचे पथक आवश्यक साहित्यासह कल्याण मंडपममध्ये दाखलही झाले. पण, लोकच त्याठिकाणी पोहोचले नाही.
अपेक्षित २५० लोकांपैकी निर्धारित वेळेत केवळ ४३ लोकांनीच आरटीपीसीआरकरिता आपले स्वॅब सॅम्पल दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, प्रभारी मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्यासह नगरपालिका प्रशासन, राजस्व विभाग आणि आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांच्या सोयीसाठी हा आरटी-पीसीआर टेस्ट कॅम्प यशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांना तशा सूचनाही दिल्या गेल्या. पण, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
कोट
कल्याण मंडपम् येथे आयोजित कॅम्पला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ ४३ लोकांनीच आरटीपीसीआरकरिता आपले स्वॅब दिलेत.
- डॉ. रोहन राठोड, कर निरीक्षक, नगर परिषद, अचलपूर.