शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
2
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
3
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
4
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
5
महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
6
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
7
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
8
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
9
"आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
10
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
11
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
12
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
13
'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
14
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...
16
काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
17
Nashik Municipal Election 2026 : कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड?
18
Makeup Viral Video: मेकअपनंतर तरुणीला ओळखणंही झालं कठीण; तरुण म्हणाले, 'हा तर विश्वासघात!'
19
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
20
उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दारु विक्रीच्या दुकानाची होणार पडताळणी

By admin | Updated: April 26, 2015 23:55 IST

येथील भाजीबाजार परिसरातील देशी दारुविक्रीच्या दुकानाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने २८ एप्रिल रोजी पडताळणी केली जाणार आहे.

निर्णय : मंगळवारी चमू दाखल होणारअमरावती : येथील भाजीबाजार परिसरातील देशी दारुविक्रीच्या दुकानाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने २८ एप्रिल रोजी पडताळणी केली जाणार आहे. वस्तुस्थिती जाणून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. त्यामुळे दारुबंदीची मागणी करणाऱ्या महिलांच्या लढ्याचे हे पहिले यश मानले जात आहे.नागरिक कृती समितीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करुन देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याची मागणी केली होती. महिला आक्रमक झाल्या होत्या. या दुकानामुळे भाजीबाजार परिसरात सामाजिक स्वास्थ्य बाधित होत असून महिला, मुलींना ये-जा करणे कठीण झाले आहे. या दुकानापासून काही अंतरावर शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे तसेच दवाखाने आहेत. १०० मीटर अंतरावर वीर वामनराव जोशी विद्यालय, मारवाडी व गुजराती समाजाचे राधाकृष्ण मंदिर असून अन्य धर्मियांची पवित्र स्थळे आहेत. त्यामुळे येथे दारूचे दुकान असणे हे नियमात बसत नाही, तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग हे दुकान हटविण्यासंदर्भात कार्यवाही करीत नाही, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांनी केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ा महिलांच्या तक्रारीची दखल घेत एक्साईजला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. एकिकडे नागरिकांची दारुबंदीची मागणी, दुसरीकडे शासनाने महसूल वाढविण्याचे आदेश दिल्यामुळे एक्साईजचे अधिकारी गोंधळून गेले आहेत. शहरात पाच ते सहा देशी दारु विक्रीची दुकाने कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी वाढत आहे. अशातच भाजीबाजारातील दारु दुकानाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणे अनिवार्य असल्याने एक्साईजने २८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दारु विक्री दुकानाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र आंदोलक महिलांना २४ एप्रिल रोजी पाठविले आहे. धार्मिक, सामाजिक स्थळापासून या दुकानाचे अंतर, आक्षेप पडताळणी करण्यासाठी एक्साईजची चमू येणार आहे. या चमूच्या अहवालावरच देशी दारु विक्रीच्या दुकानाचे भवितव्य ठरेल, असे संकेत आहे. भाजी बाजारातील दारुबंदीच्या लढ्यात अंजली पाठक, कुंदा अनासने, शालिनी रत्नपारखी, कोकीळा सोनोने, रश्मी उपाध्ये, लता राजगुरे, संगीता घोडे, ललिता ठाकरे, वर्षा किलोर, निर्जला करुले, मंदा चव्हाण, निर्मला सावरकर, उज्ज्वला करुले, वैशाली बोबडे, लता राजगुरे, शोभा काळे, ज्योती कानतुरे, सुनीता देशमुख, प्रतिभा देशमुख आदी महिलांनी मोलाची भूमिका बजावली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारु विक्रीच्या दुकानाबाबत पडताळणीचे पत्र प्राप्त झाले आहे. ही पडताळणी वस्तुस्थितीदर्शक झाली तर हे दुकान भाजीबाजारात ठेवता येणार नाही. पडताळणी होत असल्याने लढ्याचे पहिले यश आहे. यात एक्साईजने काही गडबड केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. दारुबंदीचा लढा सुरुच राहील.अंजली पाठकआंदोलक महिला, भाजीबाजार