शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख परीक्षा अर्जांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

‘पाच जिल्हे-चार दिवस’ असे परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च यादरम्यान अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांतून ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. त्याकरिता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यानिहाय टेबल लावण्यात आले. परीक्षा अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्रपणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देनियमित, बॅकलॉगचा समावेश, कॉलेजकडून अर्ज स्वीकारण्यास आरंभ

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० परीक्षांची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने नियमित व बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे सुमारे तीन लाख परीक्षा फाॅर्म पडताळणी करण्यासाठी  ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. हे परीक्षा फाॅर्म शुक्रवारपासून स्वीकारण्यास आरंभ झाले आहे.‘पाच जिल्हे-चार दिवस’ असे परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च यादरम्यान अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांतून ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. त्याकरिता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यानिहाय टेबल लावण्यात आले. परीक्षा अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्रपणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाविद्यालयातून आलेले परीक्षा अर्ज अचूक आहे अथवा नाही, याच्या पडताळणीसाठी  तज्ज्ञांची चमू तैनात करण्यात आली आहे. परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी वेळापत्रक ठरविण्यात आले असून, त्याच कालावधीत टेबलवर ते स्वीकारले जाणार आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांचे अडीच लाख, तर बॅकलाॅग विद्यार्थ्यांचे ५० हजार परीक्षा अर्ज असणार आहे. सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज असल्याची माहिती आहे. लवकरच परीक्षांचे नियोजन होणार असल्याचे संकेत आहे 

परीक्षा शुल्क, विद्यार्थी यादी बंधनकारकटेबलवर ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे परीक्षा अर्ज स्वीकारताना महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क भरले वा नाही तसेच विद्यार्थ्यांची यादी बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यापीठात परीक्षा शु्ल्क अदा केल्याची पावती तपासणी करूनच अर्ज स्वीकारले जात आहेत. यात नियमित, माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा समावेश आहे.

नियमित आणि बॅकलॉग अशा दोन्ही प्रकारचे हिवाळी-२०२० साठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर सादर केलेले परीक्षा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षा शुल्काची पावती, विद्यार्थी यादी असल्याशिवाय ते स्वीकारले जात नाही. पुन्हा या परीक्षा अर्जांची छाननी केली जाणार आहे. यात काही त्रुटी आढळल्यास सदर महाविद्यालयांना त्रुटीपत्र दिले जाईल. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा