आकाशात दिसतोय शुक्र-गुरु

By Admin | Updated: February 8, 2015 23:27 IST2015-02-08T23:27:19+5:302015-02-08T23:27:19+5:30

पृथ्वीपासून सर्वाधिक जवळचा ग्रह शुक्र व सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हे दोन्ही ग्रह सध्या आकाशात अगदी साध्या डोळ्यांनी दिसत आहेत. परंतु हे ते टेलिस्कोपमधून कसे दिसतात

Venus-guru appearing in the sky | आकाशात दिसतोय शुक्र-गुरु

आकाशात दिसतोय शुक्र-गुरु

अमरावती : पृथ्वीपासून सर्वाधिक जवळचा ग्रह शुक्र व सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हे दोन्ही ग्रह सध्या आकाशात अगदी साध्या डोळ्यांनी दिसत आहेत. परंतु हे ते टेलिस्कोपमधून कसे दिसतात ही जिज्ञासा विद्यार्थ्यामध्ये असल्याने शहरातील खगोलप्रेमी व खगोलशास्त्र आॅलिम्पियाड या आंतरराष्ट्रीय परीक्षेची तयारी करणाऱ्या सीबीएससी पॅटर्नच्या विद्यार्थ्याने टेलिस्कोपमधून गुरु व शुक्र पाहण्याची गर्दी केली आहे. शुक्र ग्रह सध्या सूर्य मावळल्यावर पश्चिम क्षीतीजावर रात्री ६ ते ८ या दरम्यान दिसतो. त्याचवेळी पूर्व क्षितिजावर गुरु ग्रह सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दिसतो.
पहाटे पश्चिमेकडे ५.३० वाजता मावळतो. हे दोन्ही ग्रह खूप चमकत असल्याने अगदी साध्या डोळ्यांनी सहज पाहता येतात. परंतु शुुक्र ग्रहाच्या कला व गुरुचे चंद्र पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता आहे. शुक्र ग्रह हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह आहे. या ग्रहाला एकही चंद्र नाहीत. हा ग्रह पृथ्वीच्या विरुध्द दिशेने फिरतो. शुक्रावर सूर्य पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो. पृथ्वीवर आपले वजन ३४ किलोग्रॅम असेल तर शुक्रावर १२.२५ किलोग्रॅम भरेल. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याला एकूण ६३ चंद्र आहेत, अशी माहिती येथील हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Venus-guru appearing in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.