व्हेन्टिलेटरअभावी चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: May 25, 2014 23:13 IST2014-05-25T23:13:56+5:302014-05-25T23:13:56+5:30

व्हेन्टिलेटरअभावी एका २६ दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ७ वाजता राजापेठ येथील एका खासगी रुग्णालयात घडली. तरमनुम बानो अब्दुल सादीक

Ventilator death due to a vacant | व्हेन्टिलेटरअभावी चिमुकलीचा मृत्यू

व्हेन्टिलेटरअभावी चिमुकलीचा मृत्यू

अमरावती : व्हेन्टिलेटरअभावी एका २६ दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ७ वाजता राजापेठ येथील एका खासगी रुग्णालयात घडली. तरमनुम बानो अब्दुल सादीक (२२, रा.नमुना) यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

तरमनुम बानो यांना २९ एप्रिल रोजी प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. प्रसुतीदरम्यान त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर मुलीची व आईची प्रकृती चांगली असल्याचे सांगुन तेथील डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली. परंतु मुलीची रविवारी प्रकृती बिघडली. तिला पुन्हा जिल्हा स्त्रि रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यास सांगीतले. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने तेथील डॉक्टरांनी मुलीला डॉ.पंजाबराव देशमुख वैद्याकीय महाविद्यालयात नेण्यास सांगितले. तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्यामुळे नातेवाईक मुलीला घेऊन राजापेठ येथील एका खासगी रुग्णालयात गेले. परंतु उपचारादरम्यान तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ventilator death due to a vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.