अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले

By Admin | Updated: August 23, 2014 02:24 IST2014-08-23T02:24:34+5:302014-08-23T02:24:34+5:30

सेंट फ्रॉन्सिस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक झाल्यावर पालकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

The vehicles of the upper district collectors stopped the vehicles | अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले

अमरावती : सेंट फ्रॉन्सिस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक झाल्यावर पालकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. मात्र संस्थाचालकांचा मनमानी कारभार सुरुच असल्याने पुुन्हा एकदा पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने कार्यालय परिसरातून बाहेर जात असतानाच त्यांचे वाहन अडवून पालकांनी निवदेन सादर केले.
जेवड नगरातील सेंट फ्रॉन्सिस हासस्कुलमध्ये संस्था चालकांनी सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांजवळून शुल्क वसूल केली होती. मात्र मान्यता रद्द झाल्याने सीबीएसई पॅटर्न बंद केल्याचे पालकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले होते. याबाबत सर्व पालक एकत्रित येऊन संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराविरुध्द पालकमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणाबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यात संस्थाचालकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पालकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन न्यायाची अपेक्षा केली होती. मात्र संस्थाचालकांनी त्यांच्या आदेशाला न जुमानता सीबीएसई अभ्यासक्रम पूर्ववत केले नाही. त्यामुळे पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमधूून टी.सी काढली नाही अशा विद्यार्थ्यांना २०१४-१५ च्या सत्रामध्ये शाळेत बसण्याची परवानगी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र संस्था चालकांनी ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश स्टेट बोर्डामध्ये केलेत त्यांना पुन्हा सीबीएसई पॅटर्नमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पाल्यांना सांगण्यात आले. या प्रकारबद्द्ल पुन्हा पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. याबद्दल शाळा व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्यांना पूर्वरत करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी ताकिदसुध्दा दिली आहे. मात्र २१ आॅगस्ट रोजी विद्यार्थी शाळेत गेल्यावर त्यांच्यासमोर शाळेत लावण्यात आलेला सीबीएसई पॅटर्नचा वेळापत्रक पेनाने क्रॉस करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डाच्या परीक्षेला बसविण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसले नाही तर शाळेमधून काढण्यात येईल, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप सेंट फ्रॉन्सिसमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या अन्यायाविरुध्द पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अप्पर जिल्हाधिकारी यांचे वाहन अडवून न्याय मागतील तसेच त्यांना निवेदन दिले.
पालकांमध्ये सतीश मल्ल, देवयानी चव्हाण, स्मिता सातव, सुजाता केशरवानी, ज्योती मत्ताणी, प्रिया दीपवानी, गीता छाबडा, सारिका कोल्हे, विशाल दादलानी, किशोर अजमिरे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: The vehicles of the upper district collectors stopped the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.