लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा परतीच्या पावसाने सर्वच प्रकारच्या भाजीपाला पिकांची नासाडी केली. त्याचा परिणाम बाजारपेठेतील भाजीपाल्यावर जाणवत आहे. त्यामुळे सर्वच भाजीपाल्यांचे भाव कडाडल्याचे चित्र आहे. याची झळ सामान्य नागरिकांना पोहचत आहे.यंदा पावसाने उसंत न दिल्यामुळे बाहेरून होणारी भाजीपाल्यांची आवक थांबली होती. तसेच नोव्हेंबरच्या पूर्वाधात परतीच्या पावसाने भाजीपाला खराब झाला. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार भाव वधारल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. महिलांचे भाजीपाल्यांसाठी असलेले महिन्याकाठीचे आर्थिक बजेट कोलमोडले आहे. कांदा, लसूण व इतर भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय अहवालानुसार कांद्याची आवक ३२० क्विंटलची झाली असून कांद्याला कमीत कमी २५०० ते ४५०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. मात्र चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ बाजारात ८० ते ९० रूपये किलो विक्री होत असल्याने कांद्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले. बटाट्यामध्ये मात्र फारशी भाववाढ नाही. पांढऱ्या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा तर लाल बटाट्याला १००० ते १४०० रुपये भाव मिळाला, त्याची आवक ९२० क्विंटलची झाली आहे. किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोने विक्री करण्यात येत आहे. कुठलाही भाजीपाला असो, किरकोळ बाजारात दामदुप्पट दराने व्यावसायिक ग्राहकांना विक्री करतात व दामदुप्पट नफा कमाविण्याचा व्यावसायच त्यांनी थाटला आहे. यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. लसूणला बाजार समितीत १० हजार ते १३ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. बाजारपेठे लसणाची आवक फारच कमी आहे. चांगल्या प्रतिचा लसूण खासगी बाजारात २०० ते २५० रूपये किलोने विक्री करण्यात येत आहे. टमाटरला १५०० ते २००० रुपये क्विंटला भाव मिळाला असून, खासगीत ३० ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे. वांगे, कोबी, मेथीचे भाव वधारले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमोडले आहे.
भाजीपाल्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:01 IST
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय अहवालानुसार कांद्याची आवक ३२० क्विंटलची झाली असून कांद्याला कमीत कमी २५०० ते ४५०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. मात्र चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ बाजारात ८० ते ९० रूपये किलो विक्री होत असल्याने कांद्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले.
भाजीपाल्यांचे भाव कडाडले
ठळक मुद्देलसून २५० रूपये किलो : सामान्यांचे बजेट कोलमोडले