वीज वाहिनीखालीच बडनेऱ्यात वीटभट्ट्या

By Admin | Updated: March 11, 2017 00:13 IST2017-03-11T00:13:20+5:302017-03-11T00:13:20+5:30

वीज वाहून नेणाऱ्या महापारेषण कंपनीच्या वीज वाहिनीच्या खाली वीटभट्ट्या आहेत.

Veerbacks in Badnerre under the electricity channel | वीज वाहिनीखालीच बडनेऱ्यात वीटभट्ट्या

वीज वाहिनीखालीच बडनेऱ्यात वीटभट्ट्या

धोका : प्रशासनाची बघ्याची भूमिका, महापारेषण कंपनीचे दुर्लक्ष
बडनेरा : वीज वाहून नेणाऱ्या महापारेषण कंपनीच्या वीज वाहिनीच्या खाली वीटभट्ट्या आहेत. भट्ट्यांची आच वीज वाहिनीपर्यंत पोहोचून त्यापासून मोठा धोका उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. यातून जिवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोंडेश्वर मार्गावर २२० केव्हीचे विद्युत उपकेंद्र आहे. वीज निर्मिती ज्या ठिकाणी होते तेथून वाहिणीद्वारे उपकेंद्रापर्यंत आणि त्याही पुढे याच वाहिनीच्या माध्यमातून विजेची व्यवस्था आहे. बडनेऱ्यातील कोंडेश्वर व अंजनगाव बारी मार्गावर वीटभट्ट्या आहेत. काही वीटभट्ट्या पारेषण कंपनीच्या व वीज वाहिनीच्या खाली व जवळपास आहे. नियमानुसार तसे करता येत नाही. विटभट्ट्यांची आस लागून वीज वाहिनी कमकुवत होऊ शकतात. कालांतराने त्या तुटूदेखील शकतात. बडनेऱ्यात पारेषण वीज वाहिणीच्या खाली किंवा जवळपास बऱ्याच वर्षांपासून वीटभट्ट्या आहेत. वीज वाहिनी तुटल्यास मोठा अपघात घडू शकतो. ज्या भागात वीज वाहिनीखाली वीटभट्ट्या आहेत. त्या परिसरात बरीच महाविद्यालये आहेत. तरीही या गंभीर बाबींकडे महापारेषण कंपनीचे दुर्लक्ष का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात महापारेषण कंपनीच्या वाहिन्यांना वीटभट्ट्यांमुळे मोठा धोका पोहोचू शकतो, असे झाल्यास याला जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे. वेळत खबरदारी घेणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

विद्युत टॉवर, खांबापर्यंत खनन
बडनेऱ्यात अंजनगाव बारी, पार्डी मार्गावर वीज वितरण कंपनीचे खांब व महापारेषण कंपनीच्या टॉवरच्या पायथ्यापर्यंत मुरुम चोरणाऱ्यांनी अवैध खनन केले आहे. या गंभीर बाबीकडे विद्युत विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असेच दुर्लक्ष होत राहिल्यास वीज वितरण कंपनीचे खांब व टॉवर केव्हाही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे. कोंडेश्वर मार्गावरील विटभट्ट्यांजवळील खांब खिळखिळे झाले आहेत. यामुळे मोठा अपघात संभवतो.

Web Title: Veerbacks in Badnerre under the electricity channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.