विविध स्पर्धांनी वाढविला संक्रांत मेळाव्याचा गोडवा
By Admin | Updated: February 2, 2016 00:14 IST2016-02-02T00:14:31+5:302016-02-02T00:14:31+5:30
एकाहून एक सरस उखाणे, विविध वेशभूषेतून होणारे वेगवेगळ्या रुपांचे दर्शन व चवदार पदार्थांची मेजवानी ठरणाऱ्या विविध स्पर्धांनी सखींचा उत्साह वाढविण्यासह संक्रांत मेळाव्याचा गोडवाही वाढविला.

विविध स्पर्धांनी वाढविला संक्रांत मेळाव्याचा गोडवा
सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद : कलर्स, सखी मंचतर्फे आयोजन, संस्कृतीसह मनोरंजनाची लयलूट
अमरावती : एकाहून एक सरस उखाणे, विविध वेशभूषेतून होणारे वेगवेगळ्या रुपांचे दर्शन व चवदार पदार्थांची मेजवानी ठरणाऱ्या विविध स्पर्धांनी सखींचा उत्साह वाढविण्यासह संक्रांत मेळाव्याचा गोडवाही वाढविला. निमित्त होते, कलर्स चॅनेल आणि सखी मंच प्रस्तुत आयोजित संक्रांत मेळाव्याचे.
लोकप्रिय कलर्स चॅनेल आणि सखी मंचच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट ठरणाऱ्या संक्रांत मेळाव्याचे अभियंता भवन, शेगाव नाका येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध स्पर्धा पार पडल्यात. ज्यात स्त्रियांच्या आवडीच्या उखाणे स्पर्धेने सुरुवात झाली. यामध्ये एकाहून एक सरस उखाणे महिलांनी सादर करून दाद मिळविली. यामध्ये अनेक सखींनी लोकमत तसेच सखी मंच यांची सांगड घालून उखाणे सादर केले. त्यानंतर तीळ व्यंजन स्पर्धा होऊन त्यात गोड, तिखट पदार्थ सखींनी तयार केलेत. संक्रांत सखी 'फॅशन शो' यामध्ये सखींनी विविध वेशभूषा सादर करून वाहवा मिळविली.
मैथिली भजन मंडळ, सोनल कॉलनी, रंजना देशमुख, मालती कडू, ज्योती भटकर, आनंदी महिला भजन कॉटन ग्रीन कॉलनी, उज्ज्वला इंगोले, प्रगती कोकाटे यांनी कृष्ण भजन सादर केले.
परीक्षक रेखा आडतीया, अरुणा वाडेकर प्राध्यापिका, महिला महाविद्यालय, अर्चना इंगोले, नगरसेविका, अमरावती महानगर पालिका , नगरसेविका सुनीता भेले, तुनाक्षी सोनारकर, समाजसेविका, अश्विनी मेश्राम, समाजसेविका, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले व बक्षिसे वितरित करण्यात आलीत.
पुन्हा एक नवीन विषय, नवीन कलाकार घेऊन कलर्स वर नावीन्यपूर्ण मालिका कृष्णदासी रसिकांच्या सेवेत प्रसारित होणार आहे. २५ जानेवारीपासून रात्री १0:३0 वा. कलर्स चॅनेलवर देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी, तुलसी आणि आराध्या या स्त्री नायिकांमध्ये गुंफण्यात आली आहे. त्याची माहिती कार्यक्रमादरम्यान चित्रफितीद्वारे देण्यात येत होती. फार पूर्वीपासून चालत आलेल्या देवदासी प्रथेला आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिकपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न कलर्स चॅनलने केला आहे. याचसाठी कृष्णभजनाचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित केला होता. उपस्थित सखींचे हळदी-कुंकू देऊन स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)