स्पायडरच्या विविध १५०० प्रजातींची नोंद
By Admin | Updated: November 11, 2015 00:22 IST2015-11-11T00:22:34+5:302015-11-11T00:22:34+5:30
अमरावती येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय स्पायडर (कोळी) वर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पायडरच्या विविध १५०० प्रजातींची नोंद
तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद : चार हजार प्रजातींची नोंद होण्याची शक्यता
संदीप मानकर अमरावती
अमरावती येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय स्पायडर (कोळी) वर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत जगात विविध १५०० प्रकारच्या स्पायडरच्या प्रजातींची नोंद झाली असून तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेनंतर ४ हजार प्रकारच्या प्रजातींची नोंद होण्याची शक्यता असल्याचे मत इंडियन सोसायटी आॅफ अॅरकोनॉलॉजीचे सदस्य स्पायडरचे संशोधक डॉ.जी.एन. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
जे.डी. पाटील सांगळूदरकर महाविद्यालय दर्यापूर व इंडियन सोसायटी आॅफ अॅशेकनॉलोजीच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ नोव्हेंबर या चार दिवसीय तिसरी आतरराष्ट्रीय स्पायडर संशोधक परिषदेचे आयोजन अमरावती येथील एका नामाकित हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या परिषदेला १८ देशांचे १२५ च्यावर स्पायडरचे (कोळी) चे संशोधक आपले संशोधनास हजेरी लावतील.
स्पायडरपासून मानवाला कुठलीही हानी होत नाही. तो चावला तरी काहीही इजा पोहोचत नाही. स्पायडरला घरातील किडे खायला आवडतात. तो किड्याला चावला तर किडा मरतो, असे मत डॉ. वानखडे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, कोळी (स्पायडर) शेतीत सोडले तर पाण्यांचा निचरा करून शेतीतील विविध पिकांवरील किडे खाण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे हे शेतकऱ्यांचा मित्र ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या स्पायडरच्या प्रजातींपासून सिल्क काढून ते जागतिक पातळीवर २०३० पर्यंत जगाच्या आर्थिक सक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावाणर आहे. त्यासाठी संशोधन सुरू आहे. स्पायडर पासून अॅण्टीबॉयोटिक तयार करण्याचीही क्षमता आहे.