वऱ्हा येथे भरदुपारी ४१ घरांवरील छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:53+5:302021-07-08T04:10:53+5:30
फोटो पी ०७ वर्हा वऱ्हा : पंधरवड्याच्या खंडित कालावधीनंतर बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वऱ्हा येथे मोठे ...

वऱ्हा येथे भरदुपारी ४१ घरांवरील छत उडाले
फोटो पी ०७ वर्हा
वऱ्हा : पंधरवड्याच्या खंडित कालावधीनंतर बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वऱ्हा येथे मोठे नुकसान केले. पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने गावाकील ४१ घरांवरील छत उडाले.
छतावरील टिनपत्रे वाऱ्याने उडून इतस्त: पसरली, तर त्यावरील दगड घरात कोसळले. इंग्रजी व साधी कौले फुटून घरात त्यांचा सडा पडला. गिरजाबाई हनुमंत किरणापुरे, सुरेश खुळे, वामन बेलसरे, वंदना विजय वाघमारे, ज्ञानेश्वर घावट, विजय डेहनकर, धृपदा महादेव कडू, सुधाकर सयाम, भीमराव मोहोड, संजय खुळे, विजय शंकर वाघमारे, अमोल जानराव वाघमारे, अतुल साहेबराव खुळे, गजानन शिरपुरे, कैलास वाघमारे यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले. तहसीलदार वैभव फरकाडे यांच्या निर्देशावरून तलाठी एस.एस. गिल यांनी पंचनामा केला. यावेळी पंचायत समिती सदस्य नीलेश खुळे, पोलीस पाटील सुरेश क्षीरसागर, सरपंच नीलिमा समरित, माजी सरपंच गणेश कामडी, दिलीप केचे, हेमंत शिरपुरे हे उपस्थित होते