जलसंवर्धनाकरिता वाठोडा होणार मॉडेल !
By Admin | Updated: October 6, 2016 00:38 IST2016-10-06T00:38:48+5:302016-10-06T00:38:48+5:30
‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही म्हण वाठोडावासियांनी प्रत्यक्षात आणली. जलव्यव-स्थापनाकरीता पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्याकरीता ...

जलसंवर्धनाकरिता वाठोडा होणार मॉडेल !
वॉटरकप स्पर्धेत तृतीय क्रमांक : जलव्यवस्थापनाचे धडे देणार, गावकऱ्यांचाही गौैरव
वरूड : ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही म्हण वाठोडावासियांनी प्रत्यक्षात आणली. जलव्यव-स्थापनाकरीता पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्याकरीता गावकऱ्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद आहे. आमिरखानच्या पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटरकप स्पर्धेत या गावाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. परंतु यशाचे श्रेय ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी न घेता ग्रामस्थांचा गौरव करण्याकरिता गावातील संस्था, नागरिकांचा हृद्य सत्कार केला. वाठोडा ज्याप्रमाणे आदर्श गावाकडे वाटचाल करीत असून एक मॉडेल गांव म्हणून उभे करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.
ही स्पर्धा जिंकून देण्यात प्रशासन सुद्धा मागे नव्हते. जिल्हाधिकारी किरण गीत्ते, तत्कालीन उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तत्कालीन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सुद्धा जिवाचे रान केले. तलाठी डी.बी.मेश्राम यांचा सिंहाचा वाटा या अभियानात राहिला. वाठोडा तालुक्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे यशस्वी गावकरी आता इतर गावांना मार्गदर्शक ठरावेत. जेणेकरून तालुक्यातील प्रत्येक गाव आदर्श ठरेल आणि आदर्श गांव बघण्यासाठी संपूर्ण राज्यातून नागरीकांचा ओढा आपल्याकडे राहिल अशी अपेक्षा संबंधितांना आहे.
जलव्यवस्थापन कसे करावे, याचे धडे येथून दिले जाणार असून यामुळे वाठोडा हे गाव एक आदर्श गांव म्हणून परिचित होईल, असे गावकऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आ. अनिल बोंडे म्हणाले. अध्यक्षस्थानी सद्गुरू योगिराज महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रकाश तट्टे, नवनियुक्त गटविकास अधिक ारी बुद्धे, प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, वरूडचे ठाणेदार गोरख दिवे, तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर, पंचायत समिती सभापती निता जिचकार, सुधाकर बंदे, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर वानखडे, जायंटस् गृप आॅफ वरूडचे अध्यक्ष नितीन खेरडे, सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, माजी व्यवस्थापक हरीभाऊ देशमुख, पं.स.माजी सभापती नीलेश मगर्दे उपस्थित होते.
या स्पर्धेकरिता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य आणि श्रमदान करून प्रोत्साहन देणाऱ्या सेवाभावी संस्था, ग्रामस्थांचा यावेळी गौैरव करण्यात आला. यामध्ये तालुका समन्वयक चिन्मय फुटाणे, अतुल काळे, विस्तार अधिकारी कांबळे, ग्रामसेवक व्ही.एस.प्रतिके, शिक्षक प्रफुल्ल भुजाडे, कृषी सहाय्यक रेखा कवडीती, पंचायत समिती कर्मचारी दीपक गणेशे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे लिपिक प्रशांत उपासे, तलाठी देवानंद मेश्राम, आर्ट आॅफ लिव्हिंगचे अशोक नानोटकर, माजी मुख्याध्यापक पी.एस.राऊत, आर. जी. देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष अनिलकुमार देशमुख, शिवदास भंडारी, माजी जि.प.सदस्य गोपाल मालपे, चंदू भिसे, सुधाकर बंदे, मिना बंदे, रमेश निवल, विनायक उपासे, हरीभाऊ देशमुख, अभिमन्यू मगर्दे, रंगराव खाडे, भाऊराव उपासे, पत्रकार प्रमोद बोंदरकर, गणेश धाडसे, राजू ढोक आदींचा गौरव करण्यात आला.
संचालन प्रतिभा काठोळे, प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगर्दे तर उपस्थितांचे आभार सरपंच मनोज बाडे ,उपसरपंच सरोज उपासे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)