शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत ‘वंचित’ नाही ! जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी धुडकावले पक्ष आदेश

By उज्वल भालेकर | Updated: April 21, 2024 13:52 IST

वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

अमरावती: रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उभे आहेत. अशातच रविवारी वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नाही. त्यामुळे लोकशाही बळकटीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच वंचितचे सर्वच तालुकाध्यक्षही त्यांच्या सोबत असल्याचेही शैलेश गवई म्हणाले.

अमरावतीमधून लोकसभा निवडणूक रिंगणात असलेले आनंदराज आंबेडकर यांनी ३ एप्रिल रोजी वंचित पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ४ एप्रिलला त्यांना वंचितने पाठिंबा दिल्यानंतर ७ एप्रिलला आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई देखील पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होते. परंतु दहा ते बारा दिवसातच जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्ष आदेश धुडकावत आनंदराज आंबेडकर यांना महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात असलेल्या कॉँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शैलेश गवई यांच्या म्हणण्यानुसार रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसन्मान देत नाहीत. आणि हा सर्व प्रकार आनंदराज आंबेडकर यांना अंधारात ठेवून सुरु आहे. त्यामुळे मताचे विभाजन होऊन संविधान विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, यासाठी ते कॉँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयासोबत वंचितचे इतरही पदाधिकारी असल्याने आनंदराज आंबेडकर सोबत ‘वंचित’ नसल्याचेह ते यावेळी म्हणाले.

आंबेडकरी समाज आंबेडकर घराण्यासोबतवंचितचे जिल्हाध्यक्ष यांची प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून ते तसेही प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. सायन्सौकर मैदान येथे झालेल्या सभेमध्येही ते कुठेच नव्हते. आणि हे आम्हाला यापूर्वीच माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. आंबेडकरी समाज हा आंबेडकर घराण्यासोबत प्रामाणिक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर