वडाळीचा कुख्यात राजासिंग टांक स्थानबद्ध

By Admin | Updated: September 24, 2016 01:24 IST2016-09-24T01:24:04+5:302016-09-24T01:24:04+5:30

कुख्यात राजासिंग अजाबसिंग टांक (२२, सिखलकरीपुरा, वडाळी) याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात

Vadali's notorious Raj Singh Tang detained | वडाळीचा कुख्यात राजासिंग टांक स्थानबद्ध

वडाळीचा कुख्यात राजासिंग टांक स्थानबद्ध

अमरावती : कुख्यात राजासिंग अजाबसिंग टांक (२२, सिखलकरीपुरा, वडाळी) याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
आरोपी राजासिंग टांक हा २०१३ पासून अवैध दारूविक्री व्यवसायात सक्रिय आहे. त्याच्याविरूद्ध फे्रजरपुरा ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वर्तनामुळे परिसरातील सुव्यवस्था बाधित झाली होती. त्यामुळे राजासिंग टांकवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात यावे, असा प्रस्ताव पीआय प्रमेश आत्राम यांनी पोलीस आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, वाळूतस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्यावर विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ नुसार राजासिंग टांक याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी.पारधी, एएसआय मनोज उसरटे, पोलीस शिपाई राजेंद्र शेंडे, विनय गुप्ता यांनी पार पाडली.

Web Title: Vadali's notorious Raj Singh Tang detained