वडाळी वनपरिक्षेत्रात एकाचवेळी मादीसह चार बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन

By Admin | Updated: May 24, 2015 00:42 IST2015-05-24T00:42:23+5:302015-05-24T00:42:23+5:30

ृवडाळी वनपरिक्षेत्रात सात ते आठ बिबट असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. आतापर्यंत एकावेळी दोन किंवा तीन बिबट ...

In the Vadali forest area, a direct demonstration of four leopards with the female at the same time | वडाळी वनपरिक्षेत्रात एकाचवेळी मादीसह चार बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन

वडाळी वनपरिक्षेत्रात एकाचवेळी मादीसह चार बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन

खळबळ : वनविभाग सतर्क, सात-आठ बिबट असल्याची पुष्टी
वैभव बाबरेकर अमरावती
ृवडाळी वनपरिक्षेत्रात सात ते आठ बिबट असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. आतापर्यंत एकावेळी दोन किंवा तीन बिबट जंगलात आढळून आलेत. मात्र, शुक्रवारी एकाचवेळी मादीसह चार बिबटांचे प्रत्यक्ष दर्शन वनअधिकाऱ्याला झाले, हे विशेष.
अमरावती वनविभागातील उपवनसरंक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांनी वनसंवर्धनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वडाळी परिक्षेत्रातील जंगलाची समृध्दी वाढली असून पोषक वातावरणामुळे वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांना जंगलात प्रवेशबंदी करुन जनावरांच्या चराईवर अंकुश लावण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात यापूर्वी अनेकदा बिबट आढळून आले. काही दिवसांपूर्वी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्यांचे अस्तित्व सिध्द झाले तर या जंगलात पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचेही पुरावे आहेत. वनविभागाने नागरिकांना सावध राहण्यासाठी अलर्ट केले आहे.

पोहरा जंगलात केली गाय फस्त
वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा जंगलात गायीची शिकार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. गाईची शिकार वाघाने केली की बिबट्याने, हे कळू शकले नाही. पोहरा जंगलातील वनमजूर शालिकराम राठोड यांची गाय जंगलात चरत असताना वाघ किंवा बिबट्याने तिची शिकार केली असावी, असा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वन्यप्राण्यांनी गाईला फस्त केल्याचे यादरम्यान आढळून आले.

पोहऱ्यात गाईची शिकार झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्या वन्यप्राण्याने शिकार केली, हे स्पष्ट झालेले नाही. वडाळीतही चार बिबट एकाचवेळी आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे. जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे.
- निनू सोमराज, उपवनसंरक्षक वनविभाग, अमरावती .

Web Title: In the Vadali forest area, a direct demonstration of four leopards with the female at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.