शहरातील याठिकाणी होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:14 IST2021-05-09T04:14:00+5:302021-05-09T04:14:00+5:30
आयसोलेशन दवाखाना या केंद्रावर कोविशिल्ड ही लस तर मनपा दवाखाना सबनिस प्लॉट, शहरी आरोग्य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना ...

शहरातील याठिकाणी होणार लसीकरण
आयसोलेशन दवाखाना या केंद्रावर कोविशिल्ड ही लस तर मनपा दवाखाना सबनिस प्लॉट, शहरी आरोग्य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना बिछुटेकडी को-व्हॅक्सिन ही लस १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार आहे. या केंद्रांवर १० मे साठी नोंदणी ९ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. पीडीएमएमएसी केंद्रावर को-व्हॅक्सिन ही लस फक्त १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार असून ९ मे साठी नोंदणी ९ मे रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल. याशिवाय ज्येष्ठ नागरीक वार्ड (एनसीडी) येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशील्डचा पहिला डोज दिल्या जाणार आहे.