डिसेंबरपर्यंत लसीकरण अवघडच, हीच गती राहिल्यास २०२२ उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:02+5:302021-06-03T04:10:02+5:30
अमरावती : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यास होणारा लसींचा ...

डिसेंबरपर्यंत लसीकरण अवघडच, हीच गती राहिल्यास २०२२ उजाडणार
अमरावती : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यास होणारा लसींचा पुरवठा व त्याद्वारे होणाऱ्या लसीकरणाची स्थिती पाहता, हे लक्ष्य एकूण अवघडच असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती राहिल्यास किमान २०२२ उजाडणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याला किमान १० हजार डोस रोज हवे आहेत. मात्र, त्या तुलनेत पुरवठा अत्यल्प होत असल्याने अर्धेअधिक केंद्र बंद राहत आहेत. जिल्ह्यात एकूण १३५ केंद्र आहेत. यात ११७ ग्रामीण व १८ केंद्र महापालिका क्षेत्रात आहेत. प्रत्यक्षात लसीकरण केंद्रांच्या क्षमतेच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत लक्ष्य कसे गाठणार, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. यावेळी पहिल्यांदा फक्त हेल्थ लाईन वर्करचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चवथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजाराचे नागरिक व आता पाचव्या टप्प्यात १४ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४,६४,४९९ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
१८ वर्षांवरील नागरिकांचे काय?
* जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या पाच लाखांचे दरम्यान आहे. लसींचा पुरवठा नसल्याने सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणदेखील बंदच आहे. फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होत असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
* जिल्ह्याला उपलब्ध साठा व केंद्रावर शिल्लक साठा याच्या प्रमाणात दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले जात आहे. १८ वर्षांआतील युवक व बालकांच्या लसीकरणाबाबत अद्याप कुठल्याच मार्गदर्शक सुचना नाहीत, याबाबत सध्या ट्रायल सुरू असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारा देण्यात आली.
* लसींचा पुरवठा नियमित झाल्यास रोज सर्व केंद्रांवर लसीकरण होऊ शकत असल्याची माहिती यंत्रणेद्वारा देण्यात आली.
बॉक्स
जिल्ह्यात १३५ लसीकरण केंद्र
जिल्ह्यात सुरुवातीला सहा केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. नंतर नागरिकांचे टप्पानिहाय लसीकरण सुरू झाल्याने ग्रामीण भागात ११७ केंद्र सुरू करण्यात आले. १८ केंद्र महापालिका क्षेत्रात सुरू आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पीएचसीत लसीकरण करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
कोट
जिल्ह्यात असलेल्या केंद्रांच्या तुलनेत पुरेसा लसींचा साठा होत नसल्याने काही केंद्र बंद आहेत. नियमित व मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्यास सर्वच केंद्र सुरू ठेवता येऊन अधिकाधिक लसीकरण करता येऊ शकते.
- डॉ दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
पाईंटर
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात
आतापर्यंत झालेले लसीकरण (१ मे २०२१)
वयोगट पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १९,२७४ १२,९९४
फ्रंटलाईन वर्कर ३०,३२७ १२,२६८
ज्येष्ठ नागरिक १,४८,०१५ ५६,८८४
४५ ते ६० वयोगट १,३४,६२१ ३१,५२७
१८ ते ४४ वयोगट १८,३९५ १९४
एकूण ३,७८,४५६ ८६,०४३