परिचर्या प्रशिक्षण केंद्रात लसीकरणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:20+5:302021-03-24T04:12:20+5:30
अमरावती : येथील इर्विन चौकातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात कोवॅक्सीन लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. दररोज सकाळी दहा वाजल्यापासून याठिकाणी ...

परिचर्या प्रशिक्षण केंद्रात लसीकरणाची सोय
अमरावती : येथील इर्विन चौकातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात कोवॅक्सीन लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. दररोज सकाळी दहा वाजल्यापासून याठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. याठिकाणी मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी आधारकार्ड सोबत घेऊन जावे. नोंदणीसाठी देण्यात येणाऱ्या चिठ्ठीवर नाव, लसीकरणाची तारीख आणि मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे. नोंदणी झाल्यानंतर लगतच्या कक्षात लसीकरण करण्यात येते. यासाठी डॉ. श्रुती देशमुख आणि अधिपरिचारिका सुवर्णा काळे कार्यरत आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्चपासून याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. दररोज शंभरहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण याठिकाणी करण्यात आले आहे. कोवॅक्सीन ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. याचे कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत. काही नागरिकांना अंगदुखी किंवा ताप आल्यास पॅरासिटामोल हे औषध घ्यावे, असा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला.
------------