वाकडे आयजी, अभिनाष ‘एसपी’
By Admin | Updated: April 30, 2017 00:03 IST2017-04-30T00:03:37+5:302017-04-30T00:03:37+5:30
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे पुण्याच्या कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकपदी स्थानांतरण झाले असून

वाकडे आयजी, अभिनाष ‘एसपी’
अमरावती : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे पुण्याच्या कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकपदी स्थानांतरण झाले असून त्यांच्या जागी पुण्याचे कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे यांची नियुक्ती झाली आहे.
अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचे स्थानांतरण मुंबई पोलीस दलाच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाले. हे पद पदोन्नतीचे आहे. अमरावतीचे नवे एसपी म्हणून अभिनाषकुमार हे रुजू होणार आहेत. शहर पोलीस दलाचे उपायुक्त शशिकुमार मीना आणि विवेक पानसरे यांच्याही स्थानांतरणाचे आदेश जारी झाले आहेत. मीना यांना बुलडाणा पोलीस दलात पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
एसीबी पोलीस अधीक्षकपदी बच्छाव
अमरावती : पानसरे यांना धुळे पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षक पदावर रुजु होणार आहेत. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे नीलेश भरणे व नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांची अमरावती शहर पोलीस दलात स्थानांतरण करण्यात आले आहे. अमरावती येथील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाचे महेश चिमटे यांचे स्थानांतरण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मध्ये करण्यात आले असून डाखोरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रकाश बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.