अवैध रेती तस्करीत टिप्परऐवजी ट्रॅक्टरचा वापर

By Admin | Updated: February 6, 2016 00:16 IST2016-02-06T00:16:14+5:302016-02-06T00:16:14+5:30

तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे. रेती तस्करांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

Use of tractor instead of illegal sand smuggled tips | अवैध रेती तस्करीत टिप्परऐवजी ट्रॅक्टरचा वापर

अवैध रेती तस्करीत टिप्परऐवजी ट्रॅक्टरचा वापर

भरारी पथकाची भीती : आडमार्गाने वाहतूक सुरू, शासनाचा महसूल बुडतोय
वरूड : तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे. रेती तस्करांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले होते. परंंतु तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी भरारी पथक तयार करून रेती तस्करांना सळो की पळो करून सोडले. एका रेती तस्करावर कारवाई झाल्याने रेती चोरट्यांनी पुन्हा शक्कल लढवून टिप्परऐवजी ट्रॅक्टरने आडमार्गाने रेती वाहतूक सुरू केली आहे.
मध्यप्रदेशातून कन्हान रेतीची मोठया प्रमाणात विक्री केली जात असून क्षमतेपेक्षा अधिक अवैध रेतीची तस्करी पहाटे तसेच रात्रीतून केली जात आहे. सध्याचे रेती विक्रेते अल्पावधीतच कोेट्यधीश झाले असून अवैध गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. याला आळा घालण्यास तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी भरारी पथकाच्या मदतीने धाड टाकून लाखो रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा केला. मात्र रेती तस्करांनी यालाही न जुमानता अवैध रेती तस्करीचा प्रयत्न सुरुच ठेवला. यामुळे चोरट्या मार्गाने रेती वाहतुकीचा प्रयत्न होत असताना मंगळवारी रात्री मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरुन विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर पुसला तलाठी जयंता भालाधरे आणि कोतवाल सुनील भाजिखाये यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. यामध्ये रेती तस्कराला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर पुन्हा रेती तस्करांनी शक्कल लढवून पुसला, देऊतवाडा, वाडेगाव, काटी वघाळ परिसरातून रेती तस्करी सुरु केली. मध्यप्रदेशातून येणाऱ्या रेतीला टिप्परऐवजी टॅ्रक्टरने वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील केवळ दोनच रेती घाट विकले गेल्याने उर्वरित रेतीघाटावरून रात्रीतून रेती चोरी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use of tractor instead of illegal sand smuggled tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.