वाहतूक नियंत्रणासाठी आता ‘स्पिकर फोन’चा वापर

By Admin | Updated: July 12, 2015 00:21 IST2015-07-12T00:21:12+5:302015-07-12T00:21:12+5:30

वर्दळीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक शाखेने आता अल्ट्रा पोर्टेबल पीए सिस्टीम कार्यान्वित केली.

Use of 'speaker phone' now for traffic control | वाहतूक नियंत्रणासाठी आता ‘स्पिकर फोन’चा वापर

वाहतूक नियंत्रणासाठी आता ‘स्पिकर फोन’चा वापर

वर्दळीच्या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित : तीनही झोनला साहित्याचा पुरवठा
अमरावती : वर्दळीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक शाखेने आता अल्ट्रा पोर्टेबल पीए सिस्टीम कार्यान्वित केली. मायक्रोफोन व स्पिकर्सद्वारे सूचनांचे आदान-प्रदान आता हायटेक यंत्रणेमार्फत सुरु झाले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करणारे साहित्य तिन्ही वाहतूक शाखांना देण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी वाहतूक शाखेची तीन भागात विभागणी केली आहेत. त्यामध्ये राजापेठ, फे्रजरपुरा व गाडगेनगर भागाचा समावेश आहे.

वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना एकमेकांशी सवांद साधता यावा, या दृष्टीने अल्ट्रा पोर्टबल पीए सिस्टीमचा उपयोग करण्यात येत आहे. सिग्नल नसणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस एकमेकांशी स्पिकर्सद्वारे सूचना देऊ शकतात.
- नीलिमा आरज,
पोलीस निरीक्षक. वाहतूक शाखा. राजापेठ झोन.

Web Title: Use of 'speaker phone' now for traffic control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.