तूर डाळीला पर्याय म्हणून हरभरा डाळीचा वापर

By Admin | Updated: November 17, 2015 00:20 IST2015-11-17T00:20:11+5:302015-11-17T00:20:11+5:30

डाळी आणि कडधान्याचे दर गगनाला भिडल्याने हॉटेल्समध्ये डाळीपासून तयार होणाऱ्या डिशच्या दरात वाढ झाली आहे.

Use of gram flour as a substitute for tur dal | तूर डाळीला पर्याय म्हणून हरभरा डाळीचा वापर

तूर डाळीला पर्याय म्हणून हरभरा डाळीचा वापर

महागाईचा फटका : सर्वसामान्यांसोबत हॉटेल व्यावसायिकांवरही संकट
अमरावती : डाळी आणि कडधान्याचे दर गगनाला भिडल्याने हॉटेल्समध्ये डाळीपासून तयार होणाऱ्या डिशच्या दरात वाढ झाली आहे. काही हॉटेल्सने दरवाढ न करताना कट प्रॅक्टीसनुसार तूर डाळीचा पर्याय म्हणून हरभरा डाळीचा वापर करत त्याला मसाल्याचा तडका दिला आहे. तर काहींनी आपली डीश तशीच ठेवून दरवाढ केली आहे. तर काहींनी दालफ्रायचे प्रमाण कमी केले आहे.
कडधान्याचे दर वाढल्याने काही प्रमाणात सर्वसामान्यांच्या आहारातून डाळी व कडधान्ये बाजूला सारु लागले आहेत. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच या दरवाढीचा फटका हॉटेल्स, कॅन्टीन, उपाहारगृहे, नाष्टा सेंटरलाही बसला आहे. इंडियन डिशेसमध्ये दालफ्राय डिशला सर्वाधिक मागणी आहे. रोटी व राईसबरोबर दाल फ्राय हवेच. शहरातील शाकाहारी हॉटेल्समध्ये आणि इतरही हॉटेल्समध्ये दालफ्राय आणि दालतडका याला पसंती असते. पण तूर डाळ वधारल्याने हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले. तुरडाळीची दरवाढ होण्यापूर्वी असलेला ७० रुपये प्लेटचा दर आता १०० रुपये झाला आहे. काहींनी मात्र दर न वाढविता त्यात अन्य स्वस्त विशेषत: हरभरा डाळीचा उपयोग सुरू केला आहे. दरवाढीपूर्वी दालफ्राय बनविताना ८० टक्के तुरडाळ आणि २० टक्के हरभरा अथवा मूग डाळीचा वापर केला जात होता.
आता मात्र तुरडाळ आणि हरभरा डाळीचे प्रमाण प्रत्येकी टप्प्याटप्यापर्यंत आले. यासाठी त्याला अधिक मसाल्यांचा तडका दिला जात आहे. हरभरा डाळीचा दर ७४ रुपये एवढा आहे. त्यामुळे मूगडाळईऐवजी हरभरा डाळीला पसंती दिली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Use of gram flour as a substitute for tur dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.