अंडाकरी, भाज्यांमध्ये अजिनोमोटोचा वापर
By Admin | Updated: May 31, 2016 00:22 IST2016-05-31T00:22:44+5:302016-05-31T00:22:44+5:30
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी भाजी चटक-मटक व स्वादिष्ट लागावी यासाठी नूडल्स, चायनीज पदार्थाप्रमाणे अंडाकरी ...

अंडाकरी, भाज्यांमध्ये अजिनोमोटोचा वापर
सावधान !: अनेक हॉटेल्समध्ये जीवघेण्या पदार्थांचे प्रमाण
अमरावती : जिभेचे चोचले पुरविण्यासाठी भाजी चटक-मटक व स्वादिष्ट लागावी यासाठी नूडल्स, चायनीज पदार्थाप्रमाणे अंडाकरी व इतर भाज्यांमध्ये शरीराला अत्यंत घातक व हानिकारक असलेला अजिनोमोटोचा वापर करण्यात येत आहे.
अंबानगरीतील हॉटेलचालक अजिनोमोटोचा सर्रास वापर करीत आहे. त्यामुळे अमरावतीकांना सावधान, करण्याची वेळ आली आहे. चायनीजच्या हातगाड्यांवर कसा प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटोचा वापर केला जातो. हे लोकमतने स्टींग करून उघडकीस आणले होते.
अनेक बिअरबार अॅन्ड रेस्टारेंटमध्ये मटन, चिकन, अंडाकरी व इतर व्हेज व नॉनव्हेज भाज्यांमध्ये तो रस्सा किंवा ग्रेव्ही जीभेला स्वादिष्ट लागावी त्याची चव यावी म्हणून या अजिनोमोटोचे मिठाप्रमाणे अधिक वापर केला जातो. परंतु नागरिकांना हे घातक पदार्थ खाण्यात गेल्यामुळे पोटांचे आजार आतड्यांचे आजार व घात असा कॅन्सरही होऊ शकतो. सतत हे अन्न पदार्थ खालल्याने अनेक आजार बळावतात. घशाचा व पोटाचा कर्करोगही यातून अनेकांना झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु अशा खाद्यपदार्थ खाण्यासाठी हौसी नागरिकांचे विशेष आकर्षण असते. परंतु याकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नागरिकांचे आरोग्य वाचविण्यासाठी अजिनोमोटोचे खाण्यातील प्रमाण कमी करण्याच्या सूचना हॉटेल चालकांना देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही अंडाकरी व इतर भाज्या व खाद्य पदार्थ खाताना यामध्ये अजिनोमोटोचा वापर तर केला नाही ना? असा थेट प्रश्न विचारावा.
काय आहे अजीनोमोटो
मोनो सोडींयम ग्लुटामेट असा त्याचे नावं आहे. त्याला ( टेस्टींग पावडर)
असेही महणतात त्या पावडरचा प्रमाणा पेक्षा जास्त वापर केल्यास अनेक आजार बळावतात. हे हॉटेलच्या भाज्या चवदार व स्वादिष्ट व्हाव्या यासाठी याचा वापर विविध हॉटेलस मध्ये व विशेषत: चायनिच्या हातगाडयांवर नुडल्स व मन्चुरीयन मध्ये सर्रास वापर केल्या जात आहे. तसेच चिकन चिली, चिकण फ्रॉय अश्या नॉन व्हेज खाद्यपदार्थातही याचा सर्रास वापर होय आहे. यामुळे नागरिक अनेक मोठया आजाराला बळी पडत आहे.