शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

शहरी दारिद्रय़ निर्मुलनाचा संकल्प!

By admin | Updated: August 23, 2014 22:39 IST

अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश

वाशिम: शहरी भागातील दारिद्रय़ावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 'शहरी गरीब व फेरिवाल्यांसाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान' १७ ऑगस्टपासून हाती घेतले असून, यामध्ये अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश आहे. विविध उपक्रमातून वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर व यवतमाळ शहरातील गोरगरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प शासनाने यानिमित्ताने सोडला आहे.बदलत्या काळानुसार मनुष्याच्या जीवनमानातही बदल होत आहेत; मात्र बदलाचे समप्रमाण नसल्याने श्रीमंत-गरीबातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान व उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान हाती घेऊन शासनाने शहरी भागातील गरीब, बेघर व फेरीवाल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करणे, शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तिंना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी देणे, नागरी बेघरांना मुलभूत सेवांसह निवार्‍याची सुविधा देणे, फेरिवाल्यांच्या उपजिविकेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आदी उद्देश या अभियानामागे ठेवण्यात आले आहेत. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर आणि यवतमाळ या सहा शहरांसह राज्यातील एकूण ५२ शहरांचा या अभियानात समावेश आहे.त्यासाठी एका प्राथमिक सर्वेक्षणानुसार शहरांमधील गरीब कुटुंब, फेरीवाले आणि बेघर कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे.त्यानंतर बेघरांना निवारा देण्याची प्रक्रीया, कौशल्य विकास प्रशिक्षणातून गरीब कुटुंबातील व्यक्तिंना रोजगारासाठी तयार करणे, स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे आदी बाबी या अभियानातून साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, बेघरांना निवारा आणि फेरिवाल्यांवर लक्ष केंद्रीत करून शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून शासनाने सोडला आहे.