शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धा तळाला; गाव, मंदिराचे अवशेष उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:05 IST

ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची भीषणता : धरणात केवळ १३ टक्के जलसाठा, शेतक री-कष्टकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष, मृत साठाच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.अमरावती जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या ऊर्ध्व वर्धा धरणाचे भूमिपूजन सन १९७६ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. विदर्भ सर्वात मोठे धरण म्हणून ऊर्ध्व वर्धाची ख्याती आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील या धरणाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील २ हजार ९५७ व मध्य प्रदेशातील १ हजार ३४५ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. अमरावती जिल्ह्यातील १३ गावांतील १ हजार २०१ आणि वर्धा जिल्ह्यातील ११ गावांतील १ हजार ४९५ अशी एकूण २ हजार ६९६ घरे पाण्याखाली बुडाली. या धरणामुळे अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ६६२ आणि वर्धा जिल्ह्यातील ६ हजार १५५ नागरिकांना आपले घरे गाव आणि शेतजमिनी सोडाव्या लागल्या. त्यांच्या समर्पणातून अप्पर वर्धा हे भव्य धरण साकारले. अमरावती व वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुके सुजलाम् सुफलाम् झाले. सन १९९४ मध्ये धरणाची दारे बंद करून पाणी साठविणे सुरू झाले. त्यावेळी विस्थापित गावांतील नागरिकांना बुडीत क्षेत्रातून बाहेर काढणे भाग पडले.करजगाव हे सन १९८० च्या सुमारास मूळ ठिकाणाहून विस्थापित करण्यात आले. या ठिकाणी नळ आणि वर्धा नदीचा संगम झाला. तिथून थोड्याच अंतरावर वर्धा नदी व माळू नदीचासुद्धा संगम झालेला आहे. या गावाचे पुनर्वसन तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरानजीक करजगाव येथे झाले. या ठिकाणी मंदिरात असलेल्या दोन्ही मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली.दोन वर्षांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची पातळी वाढली नाही. वाढत्या तापमानामुळे धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे निर्मितीपासून पाण्यात असलेली दोन्ही मंदिरे उघडी पडली आहेत. या ठिकाणी मारुतीरायाचे मंदिर तसेच शंकराचे मंदिरसुद्धा पाण्याबाहेर आले आहे.दुष्काळाने जागविल्या स्मृतीधरणासाठी संपादित केलेल्या करजगावातील हनुमान मंदिर तसेच शिव मंदिर यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याबाहेर आले आहे. या ठिकाणी सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, घराचे ओटे, परसातील विहिरी, विजेचे तुटलेले खांब, धान्याचे पेव असे अवशेष आढळून आले. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाचे अवशेषदेखील येथे आहे. दुष्काळाने स्मृती जागविल्याची प्रतिक्रिया पुनर्वसित करजगाव येथील रहिवासी दिगंबर महादेव वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प