दर्यापूर पंचायत समितीत उठाबशा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST2021-09-05T04:17:13+5:302021-09-05T04:17:13+5:30

फोटो - येवद ०४ ओ येवदा : दर्यापूर तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत हजेरी पत्रक निर्गमित करताना येणाऱ्या अडचणी तसेच इतर ...

Uprising in Daryapur Panchayat Samiti | दर्यापूर पंचायत समितीत उठाबशा आंदोलन

दर्यापूर पंचायत समितीत उठाबशा आंदोलन

फोटो - येवद ०४ ओ

येवदा : दर्यापूर तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत हजेरी पत्रक निर्गमित करताना येणाऱ्या अडचणी तसेच इतर प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी करीत प्रहार कार्यकर्त्यांनी दर्यापूर पंचायत समितीत उठाबशा आंदोलन केले.गटविकास अधिकारी बाळासाहेब रायाबोले यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निवेदन सादर केल्यानंतर शनिवारी दुपारी १२ पासून प्रदीप वडतकर, आकाश घटाळे व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात धरणे आंदोलन केले. सबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने अखेर प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी कान धरून उठाबशा काढून निषेध नोंदविला. आंदोलनात ऋषी धाबे, निखिल वानखडे, सुरेंद्र वाघ, ऋषीकेश इंगळे, शिवम भांडे, गौरव वानखडे, ऋषीकेश घटाळे, अंकुश पेढेकर, तेजस गणेशपुरे, अंकुश गोटे,तेजस कांबे, साहिल कानकिरड, केतन घटाळे, गणेश कात्रे, वैभव नवलकार, वैभव पातोंड, सोमेश नवलकार, सूरज गोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Uprising in Daryapur Panchayat Samiti