‘लोकमत रक्ताचे नाते’ लोगोचे पोलीस आयुक्त, महापौर, महापालिका आयुक्तांच्या अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:39+5:302021-06-16T04:16:39+5:30
अमरावती : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १४ जुलै दरम्यान ‘लोकमत ...

‘लोकमत रक्ताचे नाते’ लोगोचे पोलीस आयुक्त, महापौर, महापालिका आयुक्तांच्या अनावरण
अमरावती : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १४ जुलै दरम्यान ‘लोकमत रक्ताचे नाते’ या मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. अमरावतीत या मोहिमेच्या लोगोचे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, महापौर चेतन गावंडे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
‘लोकमत’ कार्यालयात मंगळवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रारंभी श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. रक्तदानातून मानवता वृद्धिंगत होते. अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे आजच्या कोरोना संकटात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी केले. महापौर चेतन गावंडे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे, असे स्पष्ट करीत कोरोना संकटात रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या माेहिमेत जास्तीत जास्त लाेकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमरावती लोकमत कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, अमरावती युनिटचे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, वरिष्ठ उपसंपादक गणेश वासनिक यांच्यासह कार्यालयातील सहकारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अमोल कडुकार यांनी केले.
------------
कोट
‘लोकमत’च्या रक्तदान चळवळीत सहभागी व्हा. ‘लोकमत’ने रक्तदान मोहिमेंतर्गत रक्ताचे नाते वृद्धिंगत करणारी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा.
- डॉ. आरती सिंग, पोलीस आयुक्त.
-----------------बॉक्स
रक्तदानासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येईल.