शिरपूर गावात अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:38+5:302021-06-02T04:11:38+5:30
फोटो पी ०१ शिरपूर धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी ...

शिरपूर गावात अवकाळी पावसाचा फटका
फोटो पी ०१ शिरपूर
धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शिरपूर गावातील पंधरा ते वीस आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान उडाल्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करणे सुरू केले आहे
धारणी तालुक्यात मागील दोन दिवसापासून अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराचा अवकाळी पडत होता. सोमवारला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान याच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या पावसात अचानक विजेच्या कडकडाट व वादळी वारा सुरू झाला. त्याचा फटका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावाला बसल्याने गावातील २० आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे अचानक उडाली. त्यामुळे आदिवासी बांधवांचे रात्रीच संसार उघड्यावर पडले. त्या भरपावसात आदिवासी बांधवांनी घरातील अन्नधान्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने घरातील पूर्ण अन्नधान्य ओले झाले. त्यासह घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार अतुल पाटोळे, आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन आदिवासी बांधवांच्या नुकसानाची पाहणी केली व तात्काळ महसूल ग्रामपंचायत प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरपूर गावात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू झाले असून, नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांकडे सानुग्रह अनुदानाची मागणी
शिरपूर गावातील आदिवासी बांधवांना तहसील प्रशासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा निधी तहसील प्रशासनाकडे नसल्याने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सानुग्रह अनुदानाच्या रकमेची मागणी केली आहे. ते अनुदान आल्यांनातर तात्काळ प्रत्येकी सहा हजार रुपये आदिवासी बांधवांना देण्यात येणार आहे.