आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करा

By Admin | Updated: October 11, 2016 00:17 IST2016-10-11T00:17:51+5:302016-10-11T00:17:51+5:30

मोर्शी नगरपरिषदेचे मुुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे येथील ...

Unsubscribe to Appa Gedam | आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करा

आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करा

नगरपालिकांमध्ये काम बंद : सीईओंना मारहाण प्रकरण 
अमरावती: मोर्शी नगरपरिषदेचे मुुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे येथील स्वीकृ त नगरसेवक जितेंद्र ऊर्फ आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नगपरिषदामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. याबाबत १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सोपवून कारवाईची मागणी रेटून धरली आहे.
मुख्याधिकारी महेश वाघमोडे कर्मचाऱ्यांसोबत शनिवारी चर्चा करीत असताना स्वीकृत नगरसेवक आप्पा गेडाम हे नगरसेवक सहकाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरले. त्यांनी निवडणुकीसंदर्भात व एलएडी बल्बच्या निविदेबाबत चर्चा करीत असताना सीओंसोबत बाचाबाची झाली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच कार्यालयातील सामानाची फेकाफेक केल्याची तक्रार मुख्याधिकारी वाघमोडे यांनी मोर्शी पोलिसात केली आहे. त्यानुसार याप्रकरणी आप्पा गेडाम यांना पोलिसांनी अटक केली. मात्र दिवसेंदिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढत आहे. या घटनांमुळे शासकीय कामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेता मोर्शी नगरपरिषदेचे स्वीकृ त नगरसेवक आप्पा गेडाम यांचे सदसत्व रद्द करून त्याच्या कठोर कारवाईची मागणी नगरपरिषदामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी देवेंद्र निकोसे, शेखर चव्हाण, अमोल ठोले, प्रशांत खोंडे, सय्यद मुबीन, प्रमोद खराटे, पुंडलिक कठाळे, शेख नाजीम अ. लतीफ, अब्दुल नासिर अब्दुल रशिद, प्रल्हाद दाभाडे व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Unsubscribe to Appa Gedam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.