शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अवकाळी, गारपिटीचा ४५ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 28, 2024 20:49 IST

प्राथमिक अहवाल : पश्चिम विदर्भात ८२३ गावांमधील रब्बी बाधित, सात गुरांचा मृत्यू.

गजानन मोहोड, अमरावती : २६ व २७ रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने पश्चिम विदर्भात १८ तालुक्यांतील ८२३ गावांत ४५ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत लहान-मोठ्या सात गुरांचा मृत्यू झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.विभागात पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात झालेले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेद्वारे होत आहे. अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात २५९ गावांत २१,७६८ हेक्टरमधील गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारी, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

याशिवाय अकोला जिल्ह्यात ३६१ गावांत १७,०६९ हेक्टरमधील रब्बी व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १४५ गावांत २,२७८ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३२ गावांत ४५० हेक्टर व वाशिम जिल्ह्यात २६ गावांमधील ३,०१४ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात एक बैल, अकोला जिल्ह्यात एक घोडा, बुलडाणा जिल्ह्यात दोन वासरे व वाशिम जिल्ह्यात एक बकरी, एक गोऱ्हे व एका गायीचा आपत्तीत मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी