रेल्वे प्रवाशांच्या माथी अप्रमाणित खाद्यपदार्थ
By Admin | Updated: December 13, 2014 22:29 IST2014-12-13T22:29:53+5:302014-12-13T22:29:53+5:30
रेल्वे गाड्यांमध्ये सर्रास अप्रमाणित खाद्यपदार्थ प्रवाशांच्या माथी मारले जात आहेत. हे खाद्यपदार्थ खाण्यायोग्य नसतानासुध्दा प्रवाशांना ते नाईलाजास्तव खरेदी करावे लागतात.

रेल्वे प्रवाशांच्या माथी अप्रमाणित खाद्यपदार्थ
अमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सर्रास अप्रमाणित खाद्यपदार्थ प्रवाशांच्या माथी मारले जात आहेत. हे खाद्यपदार्थ खाण्यायोग्य नसतानासुध्दा प्रवाशांना ते नाईलाजास्तव खरेदी करावे लागतात. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टेशननिहाय रेल्वे सुरक्षा बलाशी करार केला असून यात पोलिसांनाही यातून मोठी रक्कमही मिळते, हे विशेष.
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी रेल्वे मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे ठरविली आहेत. रेल्वेस्थानकावर काही प्रमाणात कंत्राटदारांकडून प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळण्याची आशा आहे. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये अवैध खाद्यपदार्थांची विक्री कोणाच्या आशीर्वादाने होते, हा संशोधनाचा विषय आहे.
दर अर्ध्या तासाच्या अंतरान रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या गाड्यांमध्ये अवैध खाद्यपदार्थ विक्रेते सर्रास प्रवेश करतात अन् बिनधास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री करतात. यांचे पदार्थ कोणते अधिकारी प्रमाणित करतात, हा प्रश्नच आहे. निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ जीवघेणी आहे.